Anmod Ghat: गोवा बेळगाव रस्त्याबाबत अपडेट! एकेरी वाहतूक सुरु; अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

Goa Belgaum Road: राष्ट्रीय महामार्ग अनमोड या ठिकाणी एका बाजूने खचलेला होता, त्या ठिकाणी खचलेला रस्ता दुरुस्ती करण्याचे काम सध्या गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने चालू केले आहे.
Anmod Ghat News
Anmod Ghat UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: मोले ते बेळगांव हा राष्ट्रीय महामार्ग अनमोड या ठिकाणी शनिवारी एका बाजूने खचलेला होता, त्या ठिकाणी खचलेला रस्ता दुरुस्ती करण्याचे काम सध्या गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने चालू केले आहे. दरम्यान, अवजड वाहनांना प्रवेश बंदी कायम आहे.

या ठिकाणी एका बाजूने वाहतूक सुरू केली असून लहान वाहने, बसेस तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने सोडण्यात येत आहेत. घाटावर मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहने सुरक्षितरित्या सोडण्यासाठी प्रशासनाने वाहतूक पोलिस व कुळे पोलिसांना तैनात केले आहे.

दिवस रात्र खचलेल्या महामार्गाच्या ठिकाणी पोलिसांच्या निवाऱ्यासाठी या ठिकाणी काउंटर बांधण्यात आला आहे. तसेच रस्ता खचल्याच्या ठिकाणी धोका दर्शविणारे फलकही लावलेले आहेत. रस्ता खचलेल्या ठिकाणी जेसीबी मशिनद्वारे माती बाजूला केली जात असून प्रारंभी संरक्षक भिंत उभारणार असल्याचे येथील कंत्राटदाराच्या कामगाराने सांगितले.

Anmod Ghat News
Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

अवजड वाहने चोर्ला, कारवारमार्गे

कर्नाटकहून येणाऱ्या सर्व अवजड वाहने चोर्ला व कारवार मार्गे सोडली जात आहेत. रामनगर या ठिकाणी अवजड वाहने अनमोड मार्गाच्या बाजूने जाऊ नयेत, यासाठी पोलिस तैनात ठेवले असल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले. मोले चेक नाक्यावरून सुद्धा अवजड वाहनांना प्रवेश बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Anmod Ghat News
Anmod Ghat: अनमोड घाटात वाहतूक ठप्प! संरक्षक कठड्याला धडकला ट्रक; रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा

डांबर घालून खड्डे बुजवण्याची मागणी

मोले ते अनमोड पर्यंत जाताना घाटावरील दोन तीन ठिकाणी वळणावर धोकादायक खड्डे पडले आहे. संबंधित कर्मचारी ‘त्या’ खड्ड्यात दगडांचा भराव घालतात पण दोन चार गाड्या त्यावरून गेल्यानंतर मात्र पुन्हा खड्डा होत असतो. तेव्हा संबंधित रस्ता विभागाचे अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन त्यावर डांबर आणून खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com