Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

मेरशी गोवा बझार संकुल 2 वर्षात पूर्ण करणार : गोविंद गावडे

अनेक गोमंतकियांना त्यांच्या कलागुणांना उपजीविकेचे व्यासपीठ मिळणार

दैनिक गोमन्तक

पणजी : एका दशकापूर्वी मेरशी येथील जमिनीत गोवा बझार इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. त्याच्या बांधकामाला मुहूर्त सापडत नव्हता. या गोवा बझारसाठीची निविदा लवकर काढून त्याचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

राज्य उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर बैठक झाल्यानंतर मंत्री गोविंद गावडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, या गोवा बझार संकुल उभे राहिल्यानंतर गोव्यातील कारागीर तसेच स्वयंसहाय्य गटासाठी त्यांच्या व्यापाराची विक्री करण्यासाठी आवश्‍यक असलेली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या संकुलामध्ये स्थानिक हस्तकलेचा प्रचार करण्यासाठी गोव्यातील कारागीर आणि कारागिरांसाठी ‘वन स्टॉप शॉप’ म्हणून परिकल्पित होईल. पर्यटकांनाही गोव्यात बनवण्यात येणाऱ्या हस्तकलेच्या वस्तू तसेच स्वयंसहाय्य गटांनी घरगुती खाद्यपदार्थही उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान, गोवा बझार हे संकुल येथे मेरशी येथील रस्त्याच्या जंक्शनच्या जवळच उभे राहणार असल्याने ते पणजीत येणाऱ्या स्थानिक लोकांना तसेच पर्यटकांना आकर्षण ठरणार आहे. अनेक गोमंतकियांना त्यांच्या कलागुणांना उपजीविकेचे व्यासपीठ मिळणार आहे. या संकुलातील गाळे या कलाकारांना त्यांच्या वस्तूची विक्री करण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT