Senior Bank Manager Fraud Case Panaji Dainik Gomantak
गोवा

Goa Bank Fraud: बँक मॅनेजरच निघाला भामटा! 64.25 लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल, ग्राहकांच्या नावे परस्पर काढले कर्ज

Senior Bank Manager Fraud Case Panaji: पणजी येथे बँकेच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी एका वरिष्ठ बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Manish Jadhav

Bank Manager Fraud Goa : पणजी येथे बँकेच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी एका वरिष्ठ बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला. एका बँक अधिकाऱ्याने दिलेल्या अधिकृत तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली असून या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. संशयित व्यवस्थापकाने पदाचा गैरवापर करुन बँकेची तब्बल 64.25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.

या वरिष्ठ व्यवस्थापकाने सुरुवातीला 64.25 लाख रुपयांचे कर्ज बेकायदेशीरपणे मंजूर केले. हे कर्ज मंजूर करताना बँकेच्या नियमांचे आणि निकषांचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. मात्र, हा गैरप्रकार लपवण्यासाठी आणि कर्जाची रक्कम जुळवण्यासाठी संशयिताने आणखी एक गंभीर पाऊल उचलले. त्याने बँकेच्या इतर ग्राहकांच्या नावे, त्यांच्या संमतीशिवाय आणि माहितीशिवाय अनेक बनावट कर्ज खाती उघडली. या बनावट खात्यांच्या माध्यमातून त्याने मूळ कर्जाची रक्कम 'सेट ऑफ' करण्याचा किंवा ती भरुन काढण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करुन आणि बँकेच्या अंतर्गत यंत्रणेत फेरफार करुन त्याने बँकेच्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला.

ग्राहकांच्या नकळत त्यांच्या नावे कर्ज खाती उघडली गेल्याचे समोर आल्यावर हा मोठा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यवस्थापकावर फसवणूक आणि निधीचा अपहार केल्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवला. ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करुन त्यांना या फसवणुकीत गोवल्यामुळे बँकेच्या (Bank) सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सध्या पणजी (Panaji) पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घोटाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे का, याचा शोध घेतला जात आहे. ग्राहकांनी आपल्या बँक खात्यांचे व्यवहार वेळोवेळी तपासावेत, असे आवाहनही या निमित्ताने केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT