

पणजी: पणजी पोलिस स्थानकासमोर रविवारी झालेल्या गँगफाईट प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सातजणांची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, आज मंगळवारी या प्रकरणाशी संबंधित तीन टॅक्सी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. त्यांचे परवाने रद्द करण्याची विनंती पोलिसांनी आरटीओकडे केली आहे.
या झटापटीत एका व्यक्तीच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. हेडकॉन्स्टेबल सतीश माजे यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास टॅक्सीचालकांचे दोन गट पणजी पोलिस स्थानकासमोर एकमेकांशी वाद घालत होते.
सुरुवातीला हा वाद शब्दांच्या चकमकीपर्यंत मर्यादित होता. मात्र काही क्षणांतच तो हाणामारीत परिवर्तित झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही गट थांबण्यास तयार नव्हते.
या वादातील पहिल्या गटात देऊ कवास (५२), त्याची पत्नी ज्योती कवास (४८), मुलगी रोशनी कवास (३०) आणि मुलगा सोहिल कवास (बेती) यांचा तर दुसऱ्या गटात इम्रान कबुर्गी (२३), याकुब वल्लिकार (३८, दोघेही रा. चिंबल) आणि मुबारक भंडारी (३५, बांबोळी) यांचा समावेश होता. वाद चिघळल्यानंतर देऊ कवास याने लोखंडी रॉडसारख्या वस्तूने याकुबवर हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या गटातील एका व्यक्तीने पेपर स्प्रेचा वापर करून प्रतिहल्ला केला. या हाणामारीत याकुबच्या डाव्या पायाला आणि हाताला फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
काळ्या रंगाची व्हेस्पा स्कूटर (जीए-०३-एएस-७३१०)
- एर्टिगा टॅक्सी (जीए-०३-एन-५७४४)
- एर्टिगा टॅक्सी (जीए-०७-एफ-८२३९)
- एक्सएल ६ झेटा सीएनजी टॅक्सी (जीए-०७-टी-३०९३)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.