Goa Crime: पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल
Goa Panjim Theft CaseDainik Gomantak

Panaji Crime: ग्राहक बनून आले अन् 2.30 लाखांचा नेकलेस केला लंपास, पणजीतील घटना

Goa Panjim Theft Case: पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल
Published on

सांतिनेझ - पणजी येथील पीएनजी गाडगीळ ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून आलेल्या दोघांनी हातोहात सुमारे २.३० लाखांचा सोन्याचा नेकलेस लंपास केला. ही घटना काल दुपारी दीडच्या सुमारास घडली. मात्र, रात्री दागिने ठेवताना मोजताना हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी ज्वेलरी शोरूमच्या व्यवस्थापक यशवंत भिडे यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन तरुण काल दुपारी शोरूममध्ये आले. त्यांनी विविध डिझाईनचे नेकलेस दाखवण्यास सांगितले. कर्मचारी दागिने दाखवत होते. तेव्हाच एक नेकलेस लंपास करण्यात आला.

हवा तसा नेकलेस नसल्याचे सांगून ते तेथून निघून गेले. नेकलेस चोरीला गेल्याचे रात्री दागिने मोजून ठेवताना लक्षात आले. पोलिस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com