Goa Art Dainik Gomantak
गोवा

Goa Art: 'या' कलेत सोनाली परवार हिची भरारी

Goa Art: लहानपणापासून बांबूपासून सुरेख सुंदर, वैविध्यपूर्ण कलाकृती करण्याची कला तिने आत्मसात केली.

दैनिक गोमन्तक

Goa Art: आज बरेच युवक आपल्या कलागुणांना वाव न देता नोकरीच्या मागे लागतात, तर काही युवक युवती आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये असलेले कलागुण लोकांपर्यंत पोहचवून समाजात आपला वेगळाच ठसा उमटवतात.

काकोडा - कुडचडे येथील सोनाली परवार हिने स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर आसाम येथे भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयातर्फे आयोजित बांबू प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेण्याचा मान मिळविला. या शिबिरासाठी देशातील 15 जणांची निवड झाली होती, त्यात तिचा समावेश होणे ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

गरीब घरात जन्म घेतलेली व आपल्या कुटुंबियांच्या पारंपरिक व्यवसायाला वेगळी ओळख निर्माण करून देणारी सोनाली परवार हिने आसाम येथे झालेले व राष्ट्रीय मान्यता असलेले हे 12 दिवसांचे प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. 5 ते 17 सप्टेंबर दरम्यान हे शिबिर पार पडले.

सोनालीचे कुटुंबीय पूर्वीपासून बाबू काम करतात व त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय असल्याने सोनाली त्यांना मदत करत होती. लहानपणापासून बांबूपासून सुरेख सुंदर, वैविध्यपूर्ण कलाकृती करण्याची कला तिने आत्मसात केली. सोनालीची खासियत म्हणजे, ती बाबू कलाकृतींसह कुठलीही पाहिलेली वस्तू आपल्या प्रतिभेच्या जोरावर बांबूपासून हुबेहूब तयार करते.

मुख्यमंत्र्यांना दिली समई भेट

आतापर्यंत तिने समई, बास्केट, क्लिप, आरसा, फुलदाणी, घड्याळ अशा अनेक सुंदर वस्तू बांबूपासून तयार केल्या आहेत. सोनालीने बांबूपासून तयार केलेली मोठी समई मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेट म्हणूनही दिली आहे. सोनाली गोव्यातील एकमेव अशी उत्कृष्ट कलाकार आहे जिचा बांबूपासून विविध कलाकृती तयार करण्यात हातखंडा आहे.

सोनालीला मिळाली प्रशिक्षण देण्याची संधी: सोनालीला प्रशिक्षण घेण्याबरोबर या शिबिरातील सदस्यांना प्रशिक्षण देण्याचीही संधी मिळाली. ज्यामुळे आयोजकांद्वारे प्रमाणपत्राबरोबरच तिचे भरभरून कौतुकही करण्यात आले. गोव्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याने सरकारने सोनालीच्या कलेची दखल घेणे आवश्यक होते, पण तसे अद्याप झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT