Goa Pollution: बांधकाम कचऱ्याची समस्या सुटणार; पर्यावरणमंत्र्यांची हमी!

Goa Pollution: रस्त्याच्या बाजूला हा बांधकाम कचरा जास्त प्रमाणात टाकलो जातो.
Nilesh Cabral | Goa Pollution
Nilesh Cabral | Goa PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Pollution: प्रदूषण टाळण्यासाठी बांधकाम मोडतोड व इतर कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा शोधण्याची गरज पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त करून म्हापसा येथे बांधकाम कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सीएनडी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे राज्यातील बांधकाम कचऱ्याची समस्या सुटणार असल्याचेही ते म्हणाले.

साळगाव येथे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ, रिसर्च ट्रायंगल इन्स्टिट्यूट, रेझिलिएंट एनर्जी आणि एसआयएनटीईएफ नॉर्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बांधकाम मोडतोड व इतर कचऱ्याची पर्यावरणपुरक पद्धतीने हाताळणी’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

Nilesh Cabral | Goa Pollution
Goa Administration: सांगेतील स्वस्त धान्य दुकानदारांसोबत रवी नाईक यांची बैठक!

काब्राल यांनी पुढे सांगितले, की सरकार एसआयएनटीईएफ नॉर्वेच्या सहकार्याने म्हापसा येथे बांधकाम मोडतोड व इतर कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे. राज्यातील बांधकाम मोडतोड व इतर कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यात प्रस्तावित प्रक्रिया प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल.

रस्त्याच्या बाजूला हा बांधकाम कचरा जास्त प्रमाणात टाकलो जातो, असे मंत्री काब्राल म्हणाले. तसेच अनेकदा शेतजमिनीतही हा कचरा टाकून शेतजमिनी बुजविल्या जातात. अनेकदा हा कचरा छुप्या मार्गाने मिळेल त्या ठिकाणी टाकला जात असल्याने यात कधीकधी पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्गही बंद होतात.

Nilesh Cabral | Goa Pollution
Goa News: सांगेत शाळेतून येताना विद्यार्थिनीचा विनयभंग!

त्यामुळे सरकारने या अशा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सीएनडी प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला आहे. या प्रकल्पासाठी म्हापसा येथे जागेची पडताळणी केली असून ही सरकारी जागा आहे. सध्या शेतजमिनी बुजविण्याचे प्रकार थांबविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने तोडगा काढण्यासाठी हे पाऊल असून मुख्यमंत्र्यांच्या मदतीने हे काम मार्गी लावणार, असा विश्वास मंत्री काब्राल यांनी व्यक्त केला.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खात्याचे सचिव रमेश वर्मा, आयएएस यांनी बांधकाम मोडतोड आणि इतर कचरा हाताळण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन असणे आवश्यक असल्याचे सांगितले. पूर्वीचे लोक या कचऱ्याला वेगळा कचरा मानत नव्हते. त्यामुळे या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जात नव्हती.

Nilesh Cabral | Goa Pollution
Goa: गोव्यातील देविदास भांडणकर यांचा देहदानाचा निर्णय!

आता बरीच जागरूकता आली आहे आणि आपण सर्व भागधारकांच्या सहभागासह प्रत्येक पैलू समजून घेणे आणि राज्यातील या बांधकाम मोडतोड व इतर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम खाते बांधकाम कचऱ्याच्या धोक्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे तंत्र त्याच्या बांधकाम कार्यामध्ये लागू करेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लेव्हिन्सन मार्टिन्स यांनी स्वागत केले. आरटीआय संचालक डॉ. गौरव भटियानी यांनी आभार मानले.

Nilesh Cabral | Goa Pollution
Goa News: एन.डी.अगरवाल यांची नियुक्ती नियमबाह्य- आयरिश रॉड्रिग्स

गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे कौतुक

नॉर्वेचे कौन्सुलेट जनरल अर्ने जॅन फ्लोलो यांनी राज्यातील बांधकाम मोडतोड व इतर कचऱ्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने हाताळणीसाठी नॉर्वेजियन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे कौतुक केले.

एसआयएनटीईएफचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ख्रिश्चन जे. एंगेल्सन यांनी बांधकाम मोडतोड व इतर कचरा हाताळणी, पुनर्वापर आणि वैज्ञानिक व्यवस्थापनाविषयी विविध पैलूंची माहिती दिली.

Nilesh Cabral | Goa Pollution
Goa Panchayat: कांदोळी पंचायतीकडून दुकानदार, गाडेधारकांना नोटीस!

उत्तर, दक्षिण गोव्यात केंद्रे उभारणार: बांधकाम कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉपोर्रेशनच्या माध्यमातून म्हापसा येथे ‘सीएनडी’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच उत्तर व दक्षिण गोव्यात हा कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येकी एक केंद्र उभारले जाईल, तेथून हा कचरा उचलून या प्रकल्पात आणला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com