Goa Baina Fish Sold By Weight Dainik Gomantak
गोवा

बायणात आता वजनावर मिळणार मासे, संयुक्त बैठकीत निर्णय; खारीवाडा येथील पाच विक्रेत्यांची मार्केटमध्ये सोय

Goa Baina Fish Sold By Weight: बायणा येथील मासळी मार्केटात आता वजनावर मासे विकण्याची सोय करण्याचा निर्णय आमदार दाजी साळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: बायणा येथील मासळी मार्केटात आता वजनावर मासे विकण्याची सोय करण्याचा निर्णय आमदार दाजी साळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त बैठकीत बुधवारी घेण्यात आला.

या मार्केटात पाच मासेविक्रेते वजनावर मासे विकतील. तसेच येथे ‘वाटा’ पद्धतीने मासे विक्री करणाऱ्यांनाही जागा देण्यात येणार आहे. दरम्यान, या मार्केटाच्या एक किलोमीटर व्यासात किरकोळ मासेविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांमार्फत कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे आता खारीवाडा येथे घाऊक पद्धतीने होणारी मासेविक्री बंद होण्यास मदत होणार आहे.

मुरगाव पालिका मंडळाने अलीकडेच शहर भागातील नवीन मासळी मार्केट व बायणातील जुने मासळी मार्केट अधिसूचित केले आहेत. त्यामुळे या मार्केटापासून एक किलोमीटर व्यासामध्ये इतरांना मासेविक्री करता येणार नाही.

तरीही शहरातील मासळी मार्केटचे लोकार्पण झाल्यानंतर तेथे मासेविक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरू केल्यानंतरही खारीवाडा येथे घाऊक पद्धतीने मासेविक्री सुरू आहे. या कारणास्तव काही वेळा वाद होण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे खारीवाडा येथील त्या मासेविक्रेत्यांची सोय बायणा येथील मासळी मार्केटात करण्यासंबंधीचा प्रस्ताव पुढे आला होता.

याप्रकरणी त्या मासेविक्रेत्यांना विश्वासात घेऊन चर्चा करण्यात आली. त्यामुळे ते बायणा मासळी मार्केटात प्रायोगिक तत्त्वावर व्यवसाय करण्यास राजी झाले आहेत. त्यामुळे पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी बुधवारी सकाळी संयुक्त बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आमदार साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर, नगरसेवक फ्रेड्रिक हेन्रिक्स, यतीन कामुर्लेकर, दीपक नाईक, नारायण बोरकर, मातायिस मोंतेरो तसेच पोलिस निरीक्षक वैभव नाईक व वाहतूक पोलिस निरीक्षक रॉड्रिग्ज आदी उपस्थित होते.

खारीवाडा येथे जे मासेविक्रेते आहेत, ते किलो पद्धतीने मासेविक्री करतात. तेथे स्वस्त मासे मिळत असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे शहरातील मासळी मार्केटातील मासेविक्रेत्यांना खारीवाडा येथे मासेविक्री करणाऱ्यांविषयी हरकत आहे. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण होऊ नये यासाठी खारीवाडा येथील त्या मासेविक्रेत्यांची सोय बायणा येथील मासळी मार्केटात करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्या प्रस्तावावर बुधवारच्या बैठकीत चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1970 चा शांत गोवा अन् 2026 चा हा 'अशांत' अवतार; नक्की काय बदललं गोमंतकात?

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला 'बॅक टू बॅक' मोठा झटका, विराट पाठोपाठ आता 'हा' स्टार फलंदाजही जखमी; संघाला दुखापतीचं ग्रहण

Goa Bison Attack: "अचानक समोर आला अन्" सुर्ल-पाळी मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वाराला गव्यानं उडवलं! स्थानिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण!

विवाहानंतर नाव बदलणार आहात? मग 'हा' नवीन नियम आधी जाणून घ्या, नाहीतर सरकारी कार्यालयांचे खावे लागतील चकरा

DA Hike: महागाई भत्त्यावर सुद्धा टॅक्स भरावा लागतो? 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी आयकर विभागाचा काय आहे नियम? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT