Goa Assembly 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly 2025: राजरोसपणे कॅसिनोत सुरुये 'लाईव्ह गेमिंग', आलेमाव म्हणाले... जुगार, ड्रग्जमुळे होतेय गोव्याची प्रतिमा मलीन

Goa Live Gaming Casino Issue: राज्यातील विधानसभा अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, आज (२५ मार्च) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यातील विधानसभा अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, आज (२५ मार्च) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. २४ मार्च ते २६ मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान, आज सभागृहात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लाईव्ह गेमिंग करणाऱ्या कॅसिनोंचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरलं.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या मुद्यावर अधिक आक्रमक भूमिका घेत, राज्यात पूर्णवेळ गेमिंग आयुक्त नेमण्याची मागणी केली. यामुळं गोव्यातील गेमिंग उद्योगावर नियंत्रण ठेवता येईल. तसंच अनधिकृत किंवा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालता येईल, असं मत युरी आलेमाव सभागृहात व्यक्त केलं.

गोवा राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध असलं तरी, कॅसिनोंमुळे गोव्याची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप युरी आलेमाव यांनी केला. गोवा फिरण्यासाठी आणि मजा करण्यासाठी नव्हे, तर जुगार, ड्रग्ज, अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसायासाठी ओळखला जात आहे," असा हल्लाबोल युरी आलेमाव यांनी सरकारवर केला.

जमिनीवरील कॅसिनोंकडून ३५० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा मुद्दाही त्यांनी सभागृहात उपस्थित केला. जमिनीवरील कॅसिनोंकडून थकबाकी वसूल होईपर्यंत संबंधित कॅसिनोंचे परवाने रद्द करण्याची मागणी युरी आलेमाव यांनी सरकारकडे केली.

कॅसिनोंच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, "राज्यात लाईव्ह गेमिंगला कोणतीही परवानगी नाही. असे प्रकार समोर आल्यास संबंधित कॅसिनोंचे परवाने काही काळासाठी निलंबित केले जातील. गेमिंग कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Waste Management Project: गोव्यातील दोन कचरा प्रकल्प रखडले! बायंगिणीला कोर्टाचा अडथळा, वेर्णाला पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT