Goa Crime News
Sexual AssaultDainik Gomantak

Goa Crime: दक्षिण गोव्यात 2 महिन्यात 6 लैंगिक अत्याचाराच्या घटना! वासनांधांकडून  होतेय कोवळ्या मुलींचे शोषण

Goa Crime Against Minor Girls: दक्षिण गोव्यात चालू वर्षाच्या जानेवारी ते फेब्रुवारी या पहिल्या दोन महिन्यांत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या एकूण सहा घटना नोंद झाल्या आहेत .
Published on

मडगाव: वासनांधांकडून  कोवळ्या मुली शिकार बनविल्या जात आहेत. दक्षिण गोव्यात चालू वर्षाच्या जानेवारी ते फेब्रुवारी या पहिल्या दोन महिन्यांत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या एकूण सहा घटना नोंद झाल्या आहेत .

लहान मुली आता सुरक्षित नसल्याचे या घटनांवरून सिद्ध होत असून,  ही  एक सामाजिक समस्या बनली   आहे.  वेळीच अशा घटनांवर आळा बसला नाही तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ही  भीती आहे.  यावर्षी  मायणा -कुडतरी पोलिस ठाण्यात सर्वात जास्त तीन  बलात्काराच्या घटनांची नोंद आहे. त्यानंतर कुंकळ्ळीत दोन  व मडगावात एक अशी आकडेवारी आहे. 

बलात्कार करून अन्य राज्यात पळून जाण्याच्याही घटना घडत आहेत. मायणा-कुडतरी पोलिसांनी  अशाच  एका कारवाईत  पुणे येथून  शुभम ओली या संशयिताला अटक केली होती. 

Goa Crime News
Goa Crime: गळा चिरुन डोकं केलं वेगळं; आठ वर्षापूर्वीच्या खून प्रकरणातील संशयिताची जन्मठेप रद्द

कुंकळ्ळी पोलिसांनी  एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात मूळ  झारखंड राज्यातील सुशान नायक याला अटक केली होती, तर मायणा-कुडतरी पोलिसांनी  प्लासिदा कुलासो याला जेरबंद केले होते.  याच वर्षी कासावली  येथे एका गेस्ट हाऊसमध्ये एका मतिमंद मुलीला नेऊन तिच्यावर गँगरेप करण्यात आला होता. मायणा-कुडतरी पोलिसांनी  याप्रकरणी पाचजणांना अटक केली होती.  

मुलींना  फूस लावून पळविले जाते, त्यांना प्रेमपाशात ओढले जाते. पळवून नंतर  त्यांना  दुसऱ्या राज्यात घेऊन जातात.  तेथे त्यांच्यावर बलात्कार केला जातो, असे अनेक घटनांवरून आढळून आले असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या दिली.   

Goa Crime News
Goa Crime: 13 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; व्हडलेभाट-ताळगावातील धक्कादायक घटना

विकृत मन:स्थिती कारण!

 अल्पवयीन मुलींना वासनेची  शिकार बनविणे  ही एक विकृती होय. गोव्यात आता मोठ्या  प्रमाणात परप्रांतीयांचे लोंढे येऊ लागले आहेत. त्यातील काहीजण  असे  विकृत असतात. मुलींना  या वयात बऱ्या-वाईटाची समज नसते, त्या फसल्या जाऊ शकतात. आईवडिलांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे मडगावचे एक सेवाभावी डॉक्टर व्यंकटेश हेगडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com