Goa Assembly Session Mla Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session : कुठल्या मतदारसंघात होणार क्रिकेट स्टेडियम ? आमदार सरसावले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, गोवा क्रिकेट असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आता नक्की कुठे उभारावे, याचा पेच वाढण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी गटाचे दोन आणि सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आपआपल्या मतदारसंघात क्रिकेट स्टेडियम व्हावे म्हणून पुढे सरसावले आहेत.

अनेक वर्षांपासून क्रिकेट स्टेडियमचे भिजत घोंगडे आहे. माजी मंत्री दयानंद नार्वेकर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असल्यापासून क्रिकेट स्टेडियम कुठे उभारले जाणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली, ती अजून कायम आहे.

स्टेडियमचा कोनशिला समारंभ करण्यात गोवा क्रिकेट असोसिएशनला अपयश आले आहे. नार्वेकरांनंतर चेतन देसाई, विनोद फडके, सूरज लोटलीकर अशी मंडळी अध्यक्ष होऊन गेली; पण त्यांच्या काळात स्टेडियमची केवळ घोषणा आणि चर्चाच होत राहिली.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष विपूल फडके हे स्टेडियम उभारणीसाठी आग्रही राहिले आहेत; परंतु सध्या सत्ताधारी गटाचे आमदार प्रवीण आर्लेकर धारगळमध्ये स्टेडियम व्हावे म्हणून आग्रही आहेत.

धारगळची जमीन ही सर्वात प्रथम स्टेडियमसाठी ‘जीसीए’ने निश्चित केली होती. परंतु आता सत्ताधारी गटाचे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये येथे क्रिकेट स्टेडियम उभारवे म्हणून मागणी रेटली आहे. त्यापूर्वी काहीच दिवसांपूर्वी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी म्हावळिंगे येथे स्टेडियम उभारावे म्हणून मागणी केली आहे.

‘जीसीए’ची भूमिका महत्त्वाची

तीन आमदारांनी आता क्रिकेट स्टेडियमची मागणी पुढे केल्याने सरकारसमोर निश्चित पेच असणार आहे. धारगळला स्टेडियम झाल्यास मोपा विमानतळामुळे ते विविध उपलब्धतेसाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु आता डॉ. शेट्ये व शेट यांनी पर्यटनाच्या दृष्टीने डिचोली तालुक्याला या स्टेडियमचा फायदा होईल, म्हणून मागणी रेटली आहे. या मागणीमुळे सरकारलाच आता त्यावर तोडगा काढावा लागेल; परंतु त्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT