Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: गोव्यात आता प्रत्येक गावासाठी मोफत वायफाय, शॅक मॉडेलसह खंवटेंच्या अनेक मोठ्या घोषणा

मंत्री खंवटे यांच्या घोषणा ः सर्व घटकांना विश्वासात घेऊनच नवे शॅक धोरण

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session: लोकांच्या तक्रारींचे त्वरेने निवारण करण्यासाठी ‘चॅट बोट्‍स’ ही संकल्पना राबविण्यात येईल. ‘हर घर फायबर’सह प्रत्येक गावांत मोफत वायफाय सेवा देण्याचे प्रयोजन आहे. शॅक मॉडेल धोरण अमलात येईल. वॉटर स्पोर्ट्स आणि शॅक्स व्यवसाय गोवेकरांच्याच हाती राहील, अशी ग्वाही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज रात्री उशिरा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिली.

मंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटनासह माहिती तंत्रज्ञान खात्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. आग्वाद किल्ल्यावर मद्यालयास थारा देणार नाही. पर्यटन क्षेत्राशी निगडीत तक्रारींवर तत्काळ कारवाई केली जाईल.

राज्यातील सर्व किनाऱ्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. त्यासाठी निर्भया फंडातून निधीची केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे. गत वर्षात ४६५ टाउट्‍सना अटक केली असून त्यांच्याकडून १३ लाखांचा दंड वसूल केला आहे.

नवे शॅक धोरण अमलात आणताना संबंधित सर्व घटकांना विश्वासात घेतले जाईल. उत्तर व दक्षिण गोव्यासाठी प्रत्येकी दोन शॅक मॉडेल असतील, असेही मंत्री खंवटे म्हणाले. दरम्यान, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान आणि प्रिंटिंग, स्टेशनरीविषयक मागण्या सरकार पक्षाकडून बहुमताने मंजूर करण्यात आल्या.

मंत्री खंवटे म्हणाले...

  • वर्षभरात ४६५ टाउट्‍सना अटक, १३ लाखांचा दंड

  • आग्वाद किल्ल्यावर मद्यालयाला थारा नाही

  • सागरमाला पर्यटनाचाच भाग, अनेकांना उपयुक्त

  • कोलवा किनाऱ्यावर स्वदेश धोरण राबवणार

दोन्ही जिल्ह्यांत शॅक मॉडेल

शॅक मॉडेल म्हणून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. किनारी भागात वेगवेगळे शॅक्स पाहायला मिळतात. वॉटर स्पोर्ट्स आणि शॅक्स हे व्यवसाय गोमंतकीयांकडेच राहतील असा सरकारचा प्रयत्न आहे. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी दोन शॅक मॉडेल म्हणून निरीक्षणासाठी ठेवले जातील. नवे लोक या व्यवसायात येण्यास इच्छुक आहेत, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले.

कोकणीतून ई-गॅझेट

पर्यटन क्षेत्र पुढे नेण्याची गरज आहे. त्‍यात गोवा पर्यटन विकास महामंडळाचे महत्त्‍वपूर्ण काम आहे. पायाभूत सुविधा, मार्केटिंग आणि धोरणाविषयी हे महामंडळ महत्त्वाचे कार्य करते. देशातील प्रत्येक राज्य पर्यटनवाढीसाठी प्रयत्नरत आहे.

काही नियम टोचतील, पण ते स्वीकारले पाहिजेत. कोकणीतून ई-गॅझेट काढले जाईल. आयटी धोरणानुसार १५ नोंदणीकृत आहेत. गोवा टेलिकॉम इन्फ्रास्टक्चर धोरणानुसार बीएसएनएलने ४-जी सेवा देण्यास निश्चित केले आहे, असे खंवटे म्हणाले.

छपाईचा खर्च १०० कोटी

प्रिटिंग ॲण्ड स्टेशनरी या विभागाला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. अद्ययावतीकरणाबरोबर ही यंत्रणा दुसऱ्या ठिकाणी नेणे आवश्यक आहे. पोर्तुगीजकालीन छपाई मशीन आहे, ते वस्‍तुसंग्रहालयात ठेवणे आवश्यक आहे.

ई-गॅझेटचे काम नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. १०० कोटींपर्यंत छपाईचा खर्च होत आहे. त्यामुळे तो एकाच खात्याकडून व्हावा असे आपणास वाटते. या खात्यातर्फे दहा ॲप्‍स सुरू झाले आहेत, असे खंवटे म्‍हणाले.

आध्यात्मिक व आरोग्य पर्यटनावर भर

राज्‍यातील प्रत्‍येक हॉटेल व्यावसायिकांनी पर्यटकांच्या नोंदीची माहिती ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे किती पर्यटक आले आणि गेले याची माहिती समजू शकते.

३५ विभागांच्या २२७ ऑनलाइन सेवा सुरू झालेल्या आहेत. आध्यात्मिक व आरोग्य पर्यटनावर खास भर असेल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

आता थेट रांची विमानसेवा :

देहरादून आणि वाराणसीनंतर आता थेट रांची विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. गोव्यात अधिकाधिक पर्यटक यावेत यासाठी थेट विमानसेवा असली की खूप लाभ होतो. तसेच गोव्यातील लोकांनाही इतर राज्यात जाता येते. रांची विमानसेवा सुरू झाल्यास उत्तर भारतातील पर्यटकांची संख्या वाढणार आहे, असे पर्यटनमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT