Goa Assembly Monsoon Session 2024 Goa Assembly
गोवा

Goa Assembly Monsoon Session: लक्षवेधीवरुन विरोधक सभापतींच्या हौदात, दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामकाज तहकूब

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी वीज आणि शिक्षण खात्याबाबत सत्ताधारी भाजपवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला.

Pramod Yadav

गोवा विधानसभा अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झालायं, आठवड्याच्या पहिल्या दिवशीच विरोधी बाकावरील आमदारांनी सत्ताधारी भाजपला घेरले. वीज खाते आणि शिक्षण खात्याच्या प्रश्नावरुन मंत्री सुदीन ढवळीकर आणि मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत निशाण्यावर होते.

शून्य प्रहारानंतर लक्षवेधी सूचनांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले. समान संधी दिली जात नसल्याने गोंधळ सातही विरोधक सभापतींच्या हौदात गेले अन् सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

प्रश्नोत्तराच्या काळात विविध मतदारसंघातील आमदारांनी मतदारसंघात वारंवार होणाऱ्या वीज कपातीबाबत मंत्री ढवळीकरांना विचारणा केली. यावर राज्यात वीज कपात ४० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा ढवळीकरांनी केला. याशिवाय भूमीगत केबलिंग बाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

यानंतर नवीन शैक्षणिक धोरणावरुन मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रश्न विचारण्यात आले. राष्ट्रीय शैक्षिण धोरण लागू करण्यासाठी घाई करु नये अशी मागणी काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी लावून धरली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला आमचा विरोध नाही. आम्हाला फक्त त्याच्या योग्य अंमलबजावणीबाबत आश्वसत करा. गोव्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भविष्यासाठी हे महत्वाचे आहे. घाई गडबडीत धोरण अंमलबजावणी करु नये अशी आमची भूमिक आहे, असे काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले.

तसेच, तिसरी भाषा म्हणून पोर्तुगीज, फ्रेंज आणि जर्मनी भाषेचे पर्याय उपलब्ध ठेवा, असे विरोधी बाकावरील आमदार म्हणाले.

लक्षवेधी सूचनांवरुन गोंधळ

लक्षवेधी सूचनांबाबत विरोधक आणि सत्ताधारी आमदारांना समान संधी देण्याबाबत विरोधी आमदार आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी आक्रमक पवित्रा घेत सभागृहाची प्रथा का मोडता असा सवाल सभापतींना केला.

त्यानंतर सर्व विरोधी पक्षातील आमदार सभापतींच्या दिशेने गेले आणि हौदात गोंधळ सुरु केला. अखेर लंच ब्रेकसाठी सुट्टी असताना दहा ते पंधरा मिनिटे अगोदरच सभागृहाचे कामकाज अडिचपर्यंत तहकूब केले.

गेल्या आठवड्यात अधिवेशनाच्या सुरुवातीला पहिल्या दोन दिवशी चारवेळा अधिवेशन तहकूब करण्यात आले होते. एसटी आरक्षणावरुन काँग्रेसच्या एल्टन डिकॉस्ता यांनी सभापतींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांनी सभापतींची माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली होती.

यावरुन पहिल्या दिवसाचा प्रश्नोत्तराचा तास वाया गेला. तर, दुसऱ्या दिवशी देखील तोच प्रकार घडला अखेर विषय मिटला पण, यात चारवेळा कामकाज तहकूब करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT