Sunburn Festival: 'एका दिवसात सनबर्नला परवानगी, असं दिसतंय तुम्हाला खूपच घाई होती', हायकोर्ट

Sunburn Festival: गोव्यात सनबर्न फेस्टिव्हल नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. या फेस्टिव्हलच्या आयोजनास परवानग्या देताना अनेकदा नियम धाब्यावर बसवले जातात.
Sunburn Festival: 'एका दिवसात सनबर्नला परवानगी, असं दिसतंय तुम्हाला खूपच घाई होती', हायकोर्ट
High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात सनबर्न फेस्टिव्हल नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. या फेस्टिव्हलच्या आयोजनास परवानग्या देताना अनेकदा नियम धाब्यावर बसवले जातात.

गेल्या वर्षीही गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने इतर विभागांना डावलून सनबर्नच्या आयोजनाचा अर्ज एका दिवसात पास केला होता, असे उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील निकालात म्हटले. उच्च न्यायालयाने सनबर्नच्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे निरिक्षण नोंदवले होते. GSPCB ने सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांचा अर्ज थेट स्वीकारला होता.

उच्च न्यायालयाने (High Court) आपल्या समोर सादर केलेल्या कागदपत्रांवरुन म्हटले होते की, ''SDM आणि GSPCB सारख्या प्राधिकरणांनी 28 ते 30 डिसेंबर 2022 दरम्यान फेस्टिव्हलसाठी आयोजकांना परवानगी देण्याची घाई केली होती. एवढचं नाहीतर काही विभागांना परवानगी देताना बायपास करण्यात आले.”

Sunburn Festival: 'एका दिवसात सनबर्नला परवानगी, असं दिसतंय तुम्हाला खूपच घाई होती', हायकोर्ट
Sunburn Festival In Goa : गोव्यात सनबर्न महोत्सव होणार का ? स्थानिकांचा तीव्र विरोध

राजेश सिनारी यांनी Spacebound We labs Pvt Ltd (तत्कालीन सनबर्न आयोजक), पर्यटन संचालक, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, उपजिल्हाधिकारी उत्तर, हणजूण पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी विरुद्ध जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.

सिनारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, '' सनबर्नला परवानगी देताना ध्वनीप्रदूषण आणि इतर आदेशांचेही उल्लंघन करण्यात आले आहे. एवढेच नाहीतर कायदेशीररित्या बांधील असलेल्या विशिष्ट अटींचेही उल्लंघन झाले आहे. आयोजकांनी ध्वनी प्रदूषण (नियमन नियंत्रण) नियम 2000 आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार सर्व नियमांचे पालन केले पाहिजे."

Sunburn Festival: 'एका दिवसात सनबर्नला परवानगी, असं दिसतंय तुम्हाला खूपच घाई होती', हायकोर्ट
Sunburn Festival 2024: सनबर्नला परवानगी देऊ नका: काँग्रेस नेते जना भंडारी यांची मुख्य सचिवांकडे मागणी

दरम्यान, यंदाचा सनबर्न फेस्टिव्हलही वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरवर्षी उत्तर गोव्यात मोठ्या उत्साहात सनबर्न फेस्टिव्हल साजरा केला जातो. मात्र यंदाचा सनबर्न फेस्टिव्हल दक्षिण गोव्यात साजरा करण्याची आयोजकांनी घोषणा करताच वादाला तोंड फुटले.

विरोधकांनी आयोजकांसह सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी तर दक्षिण गोव्यात सरकार ड्रग्ज कल्चर आणू पाहत असल्याचा गंभीर आरोप केला.

दुसरीकडे, दक्षिण गोव्यातील सबबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाला रविवारी बाणावली, हरमल आणि वेळसाव पंचायतींनी एकमताने विरोध केला.

एवढचं नाहीतर बाणावली आणि हरमलमधील ग्रामस्थांनी सनबर्नच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला. तर बाणावलीतील ग्रामस्थांनी थेट सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनास ड्रग्ज कनेक्शनशी जोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com