Goa Assembly Monsoon Session 2023 | Vijai Sardesai  
गोवा

सरदेसाईंनी CM, कृषिमंत्र्यांना भेट दिला सडका तांदूळ; ...म्हणाले 'खीर बनवून मला जेवायला बोलवा'

आमदार विजय सरदेसाई प्रश्न उपस्थित करताना तांदळाचे तीन पाकीटे सभागृहात आणली.

Pramod Yadav

Goa Assembly Monsoon Session 2023: राज्यात रास्त भाव दुकानातून मिळणाऱ्या सडक्या तांदळाचा विषय आज आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहात उपस्थित केला. सडका तांदूळ वितरत केल्याबाबत सरदेसाई यांनी चिंता व्यक्त केली.

तसेच, सोबत तीन खराब तांदूळ असलेली पाकीटे मुख्यमंत्री प्रमोद सवांत, कृषिमंत्री रवी नाईक आणि संचालक यांच्यासाठी ती पाकीटे आणल्याचे त्यांनी सांगितले. या तांदळाचा भात करून कसा होतो मला सांगा वाटल्यास मला जेवायला बोलवा असे सरदेसाई म्हणाले.

आमदार विजय सरदेसाई प्रश्न उपस्थित करताना तांदळाचे तीन पाकीटे सभागृहात आणली आणि मार्शेल मार्फत मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांना वितरीत करण्यात आली. यावेळी सरदेसाई यांनीश्रावणाचा महिना सुरू असून, तांदळाची चांगली खीर करा आणि मला जेवायला बोलवा असा खोचक टोला लगावला.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकारकडून तांदूळ वितरीत केल्यानंतर, तो खराब होणार नाही याची काळजी रास्त भाव दुकानदाराने घेणे अपेक्षित आहे. असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, रास्त भाव दुकानातूनच हा तांदूळ आणला असल्याचे देखील सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

याचवेळी कृषिमंत्री रवी नाईक यांनी गोदामातून तांदूळ वितरित केल्यानंतर रास्त भाव दुकानदारांनी त्याची काळजी घेणे अपेक्षित आहे. पण, पोत्याला पाणी लागल्यानंतर त्यातील तांदूळ सडतो असे उत्तर कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिले.

पावसामुळे राज्यातील पीकाचे नुकसान झाले पण, लागलेल्या वणव्यामुळे झाले नाही. तसेच, एकही शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केला नाही. असे कसे? असा सवाल आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवाडी ते पणजी फेरीसेवा

St. Francis Xavier Exposition: गोयचो सायब पावलो!! शव प्रदर्शन सोहळ्याला 170 पाकिस्तानी गोव्यात येणार; व्हिसा मंजूर झाल्याने मार्ग मोकळा

Quepem Crime: पारोडातील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले,सहा दिवसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

SCROLL FOR NEXT