Mumbai Goa Highway
Mumbai Goa HighwayAerial View of Highway

Mumbai Goa Highway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! गणपतीपूर्वी मुंबई - गोवा महामार्गाची एक लेन सुरू होणार

मागील बारा वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार याकडे सर्व कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Goa Highway: मागील बारा वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार याकडे सर्व कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या महामार्गाची पाहणी करून लवकरात लवकर मार्गाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणपतीपूर्वी सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील या बैठकीला उपस्थित होते.

'मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार आहे.'

'मुंबई- सिंधुदुर्ग मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अठरा तासांचा प्रवास आठ ते दहा तासांवर आला आहे.'

Mumbai Goa Highway
दुसरा विवाह, युवती आणि तिच्या आईची आर्थिक फसवणूक; विभागीय चौकशीत आगशीचे PSI पिंगे दोषी

'शेतकरी, प्रवासी यासोबत उद्योग संधी विस्तारण्याच्या दृष्टीने हा उपयुक्त ठरत आहे. अशा विविध दळणवळण सुविधांच्या विस्ताराला शासनाने प्राधान्यक्रमावर घेतले असून कोकणातही या पद्धतीने दळणवळण सुविधांचा विस्तार करण्यात येईल.' असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

महामार्गाच्या कामात नवीन पूल, बोगदे आणि बायपास बांधणे तसेच सध्याच्या रस्त्याचे चौपदरीकरण करणे यांचा समावेश आहे. 471-किलोमीटर गोवा मुंबई महामार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसेच, विविध शहरांसाठी थेट संपर्क निर्माण होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com