Goa Assembly Monsoon Session 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023 : कोणत्या आमदारांनी विधानसभेत काय केली सूचना...

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

कळंगुटचे आमदार मायकल लोबो...

  1. रोजंदारीवर जाणारे कामगार ठिकठिकाणी सकाळी उभे राहतात, त्यांच्यासाठी तात्पुरते कार्यालय उभारावे. त्याशिवाय त्यांची रोजंदारी ठरविली पाहिजे.

  2. हॉटेलमध्ये एचओडीसारखी पदे गोव्याच्या लोकांसाठी नाहीत. एचओडीसारखी पदे गोव्यातील लोकांसाठी मिळावीत, म्हणून अध्यादेश काढावा.

  3. साळगावातील कचऱ्याचा वास नेरूलला पोहोचला आहे. पणजीतील कचरा येतो म्हणून काही वाटत नाही. पण पंचायत स्तरावरील कचऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे.

  4. किनाऱ्यावरील पोलिस स्थानके अद्ययावत करणे आवश्यक आहे. कळंगुट पोलिस स्थानकात स्टाफ कमी आहे. रात्रीच्या गस्ती सुरू करणे आवश्यक आहे.

  5. किनारी भागात अग्निशामकचे केंद्र उभारणे आवश्यकच आहे. हणजूण येथे शॅक्सला आग लागली होती, तेव्हा अग्निशामकचे बंब म्हापशावरून आले होते..

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस...

  1. माहिती-प्रसारण खात्याने करिअर गायडन्सविषयी युवकांना मार्गदर्शन करावे.

  2. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तत्काळ सेवा वेळेत मिळत नाही.

  3. आठ ते नऊ हजार ॲप्रेंटिसशिप दिली आहे, ही दीर्घकाळ चालणारी योजना नाही.

  4. परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्यांनी सेवा देणाऱ्या कंपन्यांशी सेवेपुरता करार करावा.

  5. मरिनटाईम स्कूल सुरू करावे. मरिनटाईम कन्व्हेन्शन सेंटर गोव्यात आणावे.

  6. साळ नदीतून काढलेल्या रेतीविषयी नोंदी ठेवल्या जात नाहीत, त्या ठेवणे आवश्यक आहे.

  7. राज्यातील अनेक म्युटेशन केसेस प्रलंबित आहेत, त्या निकालात काढाव्यात.

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर...

  1. पेडणे तालुक्यात गावागावांतून १७ ते २० वर्षे वयातील मुलांचे गट तयार झालेले आहेत. ती मुले अमलीपदार्थ व्यवहारात अडकलेली आहेत. त्यासाठी अमलीपदार्थ व्यवहारांवर आळा येणे आवश्यक आहे.

  2. पोलिसांएवढे काम करूनही होमगार्डना त्यांच्याएवढे वेतन मिळत नाही. होमगार्डना १६ हजार ५०० रुपये वेतन मिळते. त्यांना सेवेत कायम करावे आणि पोलिसांप्रमाणेच त्यांनाही १३व्या महिन्याचे वेतनही दिले जावे.

  3. गोवा सदनात गोव्यातील कामगार असावेत. उपजिल्हाधिकारी-मामलेदार कार्यालयातील अपुरा कर्मचारी वर्ग आहे. उर्वरित रिक्त जागा भरल्या जाव्यात. टेनन्सी दावे प्रलिंबित आहेत, ते त्वरित निकाली काढावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT