Goa assembly monsoon session 2023 manipur violence: मणिपूर हिंसाचारावर क्रुझ सिल्वा यांनी आणलेल्या खासगी ठरावावर चर्चा करावी अशी मागणी करत विरोधकांनी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी गोंधळ घातला. विरोधकांनी सुरूवातीला वेलमध्ये जात घोषणा दिल्या आणि त्यानंतर बोलत असणाऱ्या जीत आरोलकरांनी घेराव घातला.
या गोंधळानंतर सातही जणांना मार्शल्सनी सभागृहाबाहेर काढले. यानंतर सभापती तवडकरांनी सात विरोधी आमदारांना निलंबित केले. दरम्यान, आमदार विजय सरदेसाईंनी या निलंबनाला लोकशाही विरोधी म्हटले आहे.
काय म्हणाले विजय सरदेसाई?
'गोव्याचा मणिपूर होणार नाही याची काय हमी? मणिपूरमध्ये भाजपच्या फुटीरतावादी आणि असंवेदनशील राजकारणाने डोके वर काढले आहे. आमदार क्रुझ सिल्वा यांचा खाजगी ठराव का वगळण्यात आला.'
'मणिपूर हिंसाचावर आम्हाला सभागृहात चर्चा हवी होती. गोव्यात असा वेडेपणा होणार नाही याचे स्पष्ट आश्वासन हवे होते.' असे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
'सभागृहातून आमचे निलंबन तत्वशून्य, लोकशाही विरोधी आणि गोंयकरांचा अपमान आहे. गोवा भाजप आमच्या प्रश्नांना उत्तर का देऊ शकत नाही? लोकांच्या भीतीला ते आश्वस्त का करू शकत नाहीत? त्यांना मणिपूर हिंसाचारामागील सत्याची भीती वाटते का विधानसभेतील विरोधकांची?' अशी भूमिका विजय सरदेसाई यांनी निलंबनानंतर मांडली आहे.
विरोधकांच्या गोंधळानंतर सभापती तवडकरांनी याची गंभीर दखल घेतली असून, उद्या त्यावर निर्णय घेण्याची हमी दिली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनतर सभापतींनी तवडकरांनी सात आमदारांना निलंबित केले.
आरोलकरांंना धक्काबुक्की
विरोधकांनी गोंधळ घालत यावेळी सभागृहात बोलत असताना आमदार जीत आरोलकरांना धक्कबुक्की केली. तसेच, बोलण्यापासून मज्जाव केला व घोषणाबाजी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.