Goa Assembly Monsoon Session 2023 Day 10 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023: मणिपूर हिंसाचारावरून गोवा अधिवेशनात गोंधळ; सात विरोधी आमदार दोन दिवसांसाठी निलंबित

Manipur Violence Goa Assembly Monsoon Session 2023: मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सभागृहात आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी काळे कपडे घालून निषेध व्यक्त केला.

Pramod Yadav

Goa Assembly Monsoon Session 2023 On Manipur Violence: मणिपूर हिंसाचारावरून गोवा पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी सभागृहात विरोधी आमदारांनी मोठा गोंधळ घातला.

वेलमध्ये जात विरोधकांनी चर्चेची मागणी त्यानंतर आमदार जीत आरोलकर बोलत असताना त्यांना बोलू दिले नाही व घोषणा दिल्या त्यानंतर विरोधकांना मार्शलद्वारे सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.

याची गंभीर दखल घेतली असून, उद्या त्यावर निर्णय घेतला जाईल असे सभापती तवडकर म्हणाले. दरम्यान, सत्ताधारी पक्षाने तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. त्यानंतर सभापती तवडकर यांनी सात विरोधी आमदारांना आज आणि उद्यासाठी निलंबित केले आहे.

निलंबित केलेल्या आलेल्या विरोधी पक्षातील आमदारांची नावे

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई, व्हेंझी व्हिएगस, वीरेश बोरकर, क्रुझ सिल्वा, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्ता

सभागृहात नेमकं काय घडले?

मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सभागृहात आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी काळे कपडे घालून निषेध व्यक्त केला. त्यानंतर शून्य प्रहरात विरोधकांनी या खासगी ठराव चर्चेसाठी घेण्यास नकार दिला.

त्यानंतर विरोधक आक्रमक झाले व सभापतीच्या वेलमध्ये जात घोषणाबाजी केली. त्यानंतर आमदार संकल्प आमोणकर यांनी त्यांचे प्रश्न मांडल्यानंतर जीत आरोलकर बोलण्यासाठी उभे राहिले.

दरम्यान, यावेळी विरोधकांनी आमदार जीत आरोलकरांना घेराव घातला आणि समर्थन देण्याची मागणी केली. विजय सरदेसाई यांनी आरोलकरांच्या माईकमध्ये मणिपूर मणिपूर अशा घोषणा दिल्या. त्यानंतर मार्शल्सच्या मदतीने सात आमदारांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.

तात्काळ कारवाई करण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी

घडलेली घटना चुकीची असून याची गंभीर दखल घेतल्याचे सभापती रमेश तवडकर म्हणाले. याबाबत उद्या नर्णय घेतला जाईल अशी ग्वाही तवडकर यांनी दिली. मात्र, मुख्यमंत्री सावंत यांच्यासह सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

त्यांनंतर सभापती तवडकरांनी सात विरोधी आमदारांचे आज आणि उद्यासाठी निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT