Congress Protest: काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे परिधान करुन केंद्रसरकारचा केला निषेध

Congress Protest Price Rise: लोकसभा आणि राज्यसभा कॉंग्रेस खासदारांनी संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत ‘चलो राष्ट्रपती भवन’ पदयात्रा काढली आहे.
Congress Protest
Congress Protesttwitter
Published on
Updated on

पावसाळी अधिवेशनाचा आज 15 वा दिवस आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा दोन्ही सभागृहात गदारोळ घातला. सभागृहातील गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सकाळी 11.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्नांवर काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन करीत आहेत. यासोबतच ईडीच्या छापे आणि चौकशीच्या कारवाईलाही काँग्रेस पक्ष विरोध करत आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी ईडी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहे. लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत ‘चलो राष्ट्रपती भवन’ पदयात्रा काढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

मल्लिकार्जुन खडगे काळे कपडे परिधान करून संसदेत पोहोचले

आज देशभरात महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी वेगळ्या पद्धतीने विरोध केला. खरगे आज काळ्या कुर्ता आणि पगडी घालून राज्यसभेत दाखल झाले.

राघव चढ्ढा एमएसपी हमी साठी खाजगी विधेयक आणणार

AAP खासदार राघव चड्ढा MSP ला कायदेशीर हमी देण्यासाठी आज राज्यसभेत खाजगी सदस्य विधेयक सादर केले जाणार आहे.

भाजप खासदार हरनाथ सिंह यादव यांनीही राज्यसभेत उच्च न्यायालयाचे कामकाज हिंदीत आणि प्रादेशिक भाषांमध्ये चालवण्याच्या गरजेवर शून्य तासाची नोटीस दिली आहे.

काल सभागृहाच्या कामकाजातही गदारोळ झाला

नॅशनल हेराल्ड इमारतीतील यंग इंडियनचे कार्यालय अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सील केल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. आदल्या दिवशीही ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसने संसदेत जोरदार गदारोळ केला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांच्या महागाई आणि बेरोजगारीविरोधात संसदेत आंदोलन केले.

काल सभागृहाच्या कामकाजातही गदारोळ झाला

नॅशनल हेराल्ड इमारतीतील यंग इंडियनचे कार्यालय अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सील केल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. आदल्या दिवशीही ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसने संसदेत जोरदार गदारोळ केला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com