Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Elections: कळंगुटातून लोबोंचा होणार पत्ता कट?

येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections) मोठ मोठ्या आव्हांनांना सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवोली: राज्यातील सर्वात श्रीमंत पंचायत म्हणून नामना पावलेल्या कळंगुट पंचायत (Calangute Panchayat) आणी कळंगुट मतदार संघावर गेली दहा वर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या स्थानिक आमदार तथा विद्यमान मंत्री असलेल्या मायकल लोबो (Michael Lobo) यांच्यावर येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections) मोठ मोठ्या आव्हांनांना सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

स्थानिक जागतिक ख्यातीचे व्यवसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते रिकार्डो डिसौझा (Ricardo D'Souza) सध्या कळंगुटातून निवडणूक लवढविण्याच्या तयारीत असल्याने यंदा कळंगुटातून लोबोंचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चांना उत आलेला आहे. आता या गोष्टीत कितपत सत्य दडलेले आहे हे येणारा काळच ठरवीणार आहे. दरम्यान, कळंगुटचे शहरीकरण तसेच परप्रांतीय (लमाणी) लोकांचे मंत्री मायकल लोबो यांच्याकडून पुरविण्यात येत असलेले चोंचले आणी स्थानिक लोकांच्या तुलनेत त्यांचे अधिक प्रमाणात होत असलेले लाड मंत्री मायकल लोबोसाठी येत्या विधानसभा निवडणुकीत मोठी डोकेदुखी ठरुं शकते.

दरम्यान, कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नाडीस तसेच माजी सरपंच जोजफ सिक्वेरा यांच्या सतत संपर्कात असलेल्या टीटो क्लबचे रिकार्डो डिसौझा यांनी विद्यमान आमदार तसेच मंत्री असलेल्या मायकल लोबो यांच्याविरोधात  विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी करतांनाच पडद्यामागून भाजप तसेच कॉग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या स्थानिक तसेच दिल्लीस्थित नेत्यांशी जवळीक साधलेली आहे.

दरम्यान, यदाकदाचित,भाजपच्या वरिष्ठांकडून कडून  मंत्री मायकल लोबो यांचा कळंगुटातून  पत्ता कट करण्याचा प्रयत्न झाल्याच तर  त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या  रिकार्डो डिसौझा यांना रिंगणात उतरण्याचा प्रयत्न निश्चिंतच होणार आहे मात्र त्यामुळे हा मतदारसंघ येत्या निवडणुकीत भाजपच्याच ताब्यात राहिल या गोष्टीची सध्या तरी कुणीच शाश्वता देऊं शकत नाही. दरम्यान, नियमितपणे  दुपारी एक वाजता स्वताची सकाळ पाहाणार्या व्यवसायिक रिकार्डो यांना स्थानिक जनता कितपत पसंत करील हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न तसेच मुद्दा असेल यात शंका नाही.

मायकल साठी साळगांव तर दिलायलासाठी शिवोली आधीपासूनच निश्चित: 

यदाकदाचित यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून लालबत्ती दाखवण्यात आल्यास पुर्वीपासूनच तयारीत असलेल्या मायकल लोबोंनी आपल्यासाठी सांळगांव आणी आपल्या पत्नीसाठी शिवोली मतदार संघात जाळे विळलेले आहे. दरम्यान ऑग्स्टच्या सुरुवातीपासूनच शिवोलीतील विविध प़चायत क्षेत्रातील विविध प्रभागात बैठका घेण्याचे सत्र सुरु केले आहे. दरम्यान, इतकी वर्षे  आमदार मंत्री राहीलेल्या स्वकीय जातीच्या आमदार मंत्र्यांकडून शिवोलीची झालेली वाताहात पाहाता येत्या विधानसभा निवडणुकीत व्यक्ती नव्हे तर इतिहास बदलण्याचा कायम इरादा केलेल्या शिवोलकरांचा मंत्री लोबो यांच्या बैठकांना जागोजागी मोठा प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. 

यंदाचे कळंगुटातील इच्छुक उमेदवार :

विद्यमान आमदार तथा मंत्री यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी गुढघ्याला बाशींग बांधून असलेल्या उमेदवारांमध्ये व्यवसायिक रिकार्डो डिसौझा प्रथम स्थी असून त्यांच्यामागोमाग माजी आमदार तथा कॉग्रेसचे वरिष्ठ नेते आग्नेलो फर्नाडीस, भाजपचे स्थानिक कार्यकर्ते तथा कळंगुट पंच सदस्य सुदेश मयेकर, गोंयचो आवाजचे रोशन माथाईश, आदींचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT