Goa Kadamba Bus: कदंबा हे एक कुटुंब ; आमदार दयानंद सोपटे

मांद्रे ते तुये आरोबा व्हाया म्हापसा अशी कदंबा बससेवा सुरु (Goa Kadamba Bus)
Goa Kadamba Bus Service, (Madrem - Aaroba - Tuem - Mapusa)
Goa Kadamba Bus Service, (Madrem - Aaroba - Tuem - Mapusa)Dainik Gomantak

कदंबा महामंडळाने (Kadamba Depo) आणि सरकारने कधी जनतेसाठी बससेवा सुरु करताना सरकारच्या तिजोरीत महसूल मिळेल म्हणून हि सेवा सुरु केली नाही, आर्थिक तोट्यातही असताना कदंबा बससेवा (Kadamba Bus Service) हि जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहे, कदंबा बस हे आपले एक कुटुंब आहे आणि सर्व प्रवासी त्याचे सदस्य आहोत. त्या कदंब बसची आम्हाला निगा राखावी लागेल असे उद्गार मांद्रे ते तुये आरोबा व्हाया म्हापसा (Mandrem To Mapusa , via Aaroba - Tuem) अशी कदंबा बससेवा सुरु केल्यानंतर आमदार दयानंद सोपटे बोलत होते(MLA Dayanand Sopate). मांद्रे देऊळवाडा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मांद्रेचे सरपंच सुभाष आसोलकर, माजी सरपंच तारा हडफडकर, माजी सरपंच विष्णू सावंत, तिकीट तपासणी अधिकारी श्री. खर्बे, माजी सरपंच संतोष बर्डे, महेश मांद्रेकर, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत, गोविंद आसगावकर, माजी उपसरपंच आणि पंच डेनिस ब्रिटो,आदी नागरिक उपस्थित होते. (Goa Kadamba Bus)

Goa Kadamba Bus Service, (Madrem - Aaroba - Tuem - Mapusa)
19 वर्षीय तरूणीच्या मृत्यू प्रकरणातील गुढ उकलेना

कदंबा बसला विरोध

मोर्जीवासियांची गरज आणि मागणी लक्षात घेवून आमदार दयानंद सोपटे यांनी १२ रोजी सकाळी साडे सात वाजता मोरजी व्हाया पणजी अशी कदंबा बससेवा सुरु केली. त्याबद्दल सरपंच वैशाली शेटगावकर यांच्यासहित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तर दुसऱ्या बाजूने खाजगी बस मालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांच्या नैतृत्वाखाली शिवोली येथील वीस बस व्यावसाईकानी आमदार दयानंद सोपटे यांची सायंकाळी त्याच दिवशी भेट घेवून त्या बससेवेला विरोध केला. बस मालकांचे म्हणणे होते, कि याच वेळी खाजगी बस सेवेला परमिट आहे. त्यावर आमदार दयानंद सोपटे यांनी जर खाजगी बसेला परमिट असेल तर उद्या पासून बससेवा सुरु करा कदंबा बससेवा त्यावेळच्या वेळेला बंद करू असा इशारा खाजगी मालकाना दिला असल्याची माहिती आमदार दयानंद सोपटे यांनी यावेळी दिली.

Goa Kadamba Bus Service, (Madrem - Aaroba - Tuem - Mapusa)
Independence Day: गोव्यात तिरंगा फडकवण्यास विरोध; नौदलाला रद्द करावा लागला कार्यक्रम

कदंबा बससेवा बंद करू नका

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना लोकांच्या मागणीनुसार बससेवा सुरु केली आहे. कदंबा अधिकाऱ्यांकडे त्या त्या भागातील आमदार मंत्री दबाव आणून बससेवा सुरु केलेली बंद करू पाहणार त्याला कुणी बळी पडू नये, ज्यावेळी एखादा आमदार स्थानिक लोकांच्या मागणीनुसार बससेवा सुरु करतात त्यानुसार स्थानिक आमदाराना विश्वासात घेवून निर्णय घ्यावा, एकदा चालू केलेली बससेवा बंद पडणार नाही, मागे पुढे वेळ बदल होवू शकतो. मात्र बससेवा बंद करू नका असे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी केले.

Goa Kadamba Bus Service, (Madrem - Aaroba - Tuem - Mapusa)
कोविडमुळे जीव गमावलेल्या कुटुंबियांसाठी 2 लाख; मुख्यमंत्र्यांची मदत

मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर यांनी बोलताना कोरोना काळात खाजगी बसमालकाना सेवा देणे परवडत नाही. अश्या कठीण समयी आमदार दयानंद सोपटे यांच्या प्रयत्नामुळे हि बससेवा सुरु केली त्याबद्दल समाधान व्यक्त केले. माजी सरपंच तारा हडफडकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com