Goa Assembly Election Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: गोव्यात निवडणूक वेळेवरच! मध्यावधी निवडणुकीचे संकेत नाहीत; फेब्रुवारी अखेर शक्यता

Goa Assembly Election 2027: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या गोवा भेटीमुळे विधानसभा निवडणूक लवकर होणार का, या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या गोवा भेटीमुळे विधानसभा निवडणूक लवकर होणार का, या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्यात डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक घेण्याचे कोणतेही संकेत मिळाले नसल्याने निवडणूक ठरल्याप्रमाणे फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ज्ञानेश कुमार यांनी बुधवारी मडगावात निवडणूक प्रक्रियेत सक्रिय असलेल्या निवडक ‘बीएलओं’शी संवाद साधला. यावेळी पत्रकारांना संवादापासून दूर ठेवण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, कुमार यांनी ‘बीएलओ’ना निवडणूक प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी, अनुभव आणि प्रत्यक्ष कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. निवडणुकीच्या तारखेबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

२०२२ मध्ये गोव्यात विधानसभा निवडणूक मार्चमध्ये झाली होती. सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या सुमारे सहा महिने आधी मुख्य निवडणूक आयुक्त संबंधित राज्याला भेट देतात. त्यामुळे कुमार यांची भेट निवडणूक तयारीचा नियमित भाग असल्याचे मानले जात आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यानेही फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली. गोव्याचे माजी निवडणूक आयुक्त प्रभाकर तिंबले यांनी मात्र निवडणूक आयुक्तांची भेट व निवडणुकीची तारीख यांचा थेट संबंध नसल्याचे सांगितले.

‘ते’ अधिकार आयोगाला नाहीत

ज्येष्ठ वकील ॲड. क्लिओफात कुतिन्हो यांच्या मते, राज्य सरकारच्या शिफारशीशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणूक घेता येत नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT