Goa Road Accident: बुलेटचा हट्ट जीवावर बेतला; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, अल्पवयीनाला वाहन दिल्याने वडिलांवर गुन्हा

16 Year Old Killed In Goa Acciden: सोनसोडो येथील अमृतनगर परिसरात बुलेट आणि कारची धडक होऊन १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
16 Year Old Killed In Goa Acciden
Goa Road AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सोनसोडो येथील अमृतनगर परिसरात बुलेट आणि कारची धडक होऊन १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आबेल मिनेझिस असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला.

अल्पवयीन मुलाला बुलेट चालविण्यास दिल्याप्रकरणी त्याचे वडील रुई मिनेझिस यांच्याविरुद्ध फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रुई हे कुडतरी पंचायतीचे माजी सरपंच आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतनगर येथील साळगावकर हाऊसजवळ, मातृछायाकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला.

16 Year Old Killed In Goa Acciden
Goa Police: 'खाकी'ची अरेरावी; 5 पोलिसांवर कारवाई, हॉटेलमालकाला धमकी देणारा आता राखीव दलात

खोर्जे-कुडतरी येथील आबेल बुलेटवरून जात असताना पाजीफोंड, मडगाव येथील रौनक संदीप रायकर (२६) यांच्या कारची बुलेटला धडक बसली. या अपघातात आबेल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

शवविच्छेदन अहवालानुसार, तोंड, छाती आणि पोटाच्या भागात झालेल्या गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे आबेलचा मृत्यू झाला. दरम्यान, अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी त्याचे वडील रुई मिनेझिस यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्वशील देविदास पुढील तपास करीत आहेत.

16 Year Old Killed In Goa Acciden
Goa Assembly Business Bill: रोजगारासाठी उद्योजकांना पायघड्या; विधानसभेत 'व्यवसाय सुलभता विधेयक' विरोधकांच्या गदारोळात मंजूर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com