Arpora Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

रोशन रेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; वेगळ्या शाईने 'हाऊस नंबर', बार, नाईट क्लब शब्द घुसवले; न्यायालयात युक्तिवाद

Arpora Nightclub Fire: बर्च प्रकरण हे केवळ तांत्रिक त्रुटीपुरते मर्यादित नसून २५ निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गंभीर फौजदारी गुन्हा असल्याचे न्यायालयात युक्तिवादादरम्यान नमूद करण्‍यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बर्च प्रकरण हे केवळ तांत्रिक त्रुटीपुरते मर्यादित नसून २५ निष्पाप लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला गंभीर फौजदारी गुन्हा असल्याचे न्यायालयात युक्तिवादादरम्यान नमूद करण्‍यात आले. या पार्श्वभूमीवर संशयित माजी सरपंच रोशन रेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

सरकारी वकिलांनी स्पष्ट केले की, २०१६ मध्ये साध्या ‘बार आणि रेस्टॉरंट’चे ‘नाईट क्लब’ मध्ये बेकायदेशीर रूपांतर करताना बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. यात रेडकर यांची भूमिका काय होती, हे शोधण्यासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. राजकीयपद किंवा सामाजिक प्रतिमेच्या नावाखाली इतक्या मोठ्या गुन्ह्यातील संशयिताला सवलत देणे अन्यायाचे ठरेल.

रेडकरच्या वकिलांचा युक्तिवाद

रेडकरच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, बांधकाम २००५ पासूनचे आहे आणि रेडकर २०२२ मध्ये सरपंच झाले. त्यांनी केवळ पंचायतीच्या सामूहिक ठरावावर स्वाक्षरी केली होती. मात्र, म्हापसा सत्र न्यायालयाने आधीच अर्ज फेटाळल्यानंतर, आता उच्च न्यायालयानेही या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

मार्च २०२४मध्ये परवान्याची मुदत होती संपली

व्यापार परवान्यासाठीचा अर्ज ११ डिसेंबर २०२३ मध्ये केला होता तर केवळ पाच दिवसांत १६ डिसेंबर २०२३ रोजी तो मंजूर करण्यात आला. अर्जावर नंतरच्या काळात वेगळ्या शाईने ‘हाऊस नंबर’, ‘बार’ आणि ‘नाईट क्लब’ हे शब्द घुसवण्यात आले. हे सर्व पंचायत कार्यालयात असताना घडल्याचे न्यायालयाने नमूद केले.

ज्या जागेवर क्लब होता (सर्व्हे क्र. १५९), ती जागा ‘मिठागर’ असून तिथे अनधिकृत बांधकाम होते. मात्र, कायदेशीर वैधता दाखवण्यासाठी दुसऱ्या जागेचा (सर्व्हे क्र. १५८) हाऊस नंबर अर्जावर नमूद करण्यात आला. हा केवळ तांत्रिक दोष नसून जाणीवपूर्वक केलेला बनावटगिरीचा प्रकार आहे.

एप्रिल २०२४ मध्ये पंचायतीने स्वतः या अनधिकृत बांधकामाला पाडण्याची नोटीस दिली होती. मार्च २०२४ मध्ये परवान्याची मुदत संपली होती, तरीही रेडकर यांनी तो रद्द करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. ही त्यांची ‘जाणीवपूर्वक केलेली चूक’ असल्याचे न्यायालयाने म्हटले.

जेव्हा रेडकर यांना चौकशीसाठी हणजूण पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले, तेव्हा त्यांनी सुमारे १०० लोकांचा जमाव जमवून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रभावामुळे साक्षीदारांवर दडपण येऊ शकते, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT