Goa Accident: मद्यधुंद कारचालकाने दिली मांडवी पुलावर धडक! तिघे जखमी, एकाचा मृत्यू; संशयिताविरुध्द सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्‍चित

Mandovi Bridge Accident: संशयित शेट याने आपली कार मद्यधुंद अवस्थेत चालवत जुन्या मांडवी पुलावर रस्ता दुरुस्ती करणाऱ्या कामगारांना आणि ''जेट पॅचर'' मशीनला जोरदार धडक दिली होती.
Court Order
Court OrderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जुन्या मांडवी पुलावर २२ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या भीषण अपघातातील मुख्य संशयित संकेत शेट (मडकई) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये ''सदोष मनुष्यवधाचे'' आरोप निश्चित करण्याचा आदेश उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला आहे. मद्यधुंद अवस्थेत अतिवेगाने गाडी चालवून एका कामगाराचा जीव घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

संशयित शेट याने आपली कार मद्यधुंद अवस्थेत चालवत जुन्या मांडवी पुलावर रस्ता दुरुस्ती करणाऱ्या कामगारांना आणि ''जेट पॅचर'' मशीनला जोरदार धडक दिली होती. या अपघातात तिघे कामगार गंभीर जखमी झाले होते, तर २४ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला होता.

सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने असा दावा केला होता की, संशयिताचा कोणालाही मारण्याचा हेतू नव्हता, त्यामुळे त्याच्यावर कलम १०५ ऐवजी कलम १०६ लावण्यात यावे. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजया आंब्रे यांनी हा युक्तिवाद फेटाळला.

Court Order
Goa Accident: गोव्यात रस्त्यांवरून चालणे ठरत आहे धोकादायक? 57 पादचाऱ्यांचा अपघाती मृत्‍यू; रस्‍ता सुरक्षेबद्दल जागृतीची मागणी

पुलावर वेग मर्यादा ३० किमी/तास असताना गाडी अतिवेगात होती, आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता आणि अशा स्थितीत गाडी चालवल्यास कोणाचा तरी मृत्यू होऊ शकतो, याची ''जाणीव'' संशयिताला असणे अपेक्षित आहे या बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने आरोप निश्चित केले.

Court Order
Train Accident: काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालत्या ट्रेनवर कोसळले क्रेन, 22 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु VIDEO

न्यायालयाने संशयितावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०५, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये आरोप निश्चित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com