Leopard Dainik Gomantak
गोवा

Leopard Attack: चिंता वाढली! मध्यरात्री बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा; हरमलमधील थरार CCTV मध्ये कैद

Leoppard In Bicholim: पाळीव कुत्रा रात्री २.३० वा.च्या सुमारास बिबट्याने पळविल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Sameer Panditrao

हरमल : मधलावाडा येथील मार्सेलीन फर्नांडिस यांच्या अंगणात बांधून ठेवलेला पाळीव कुत्रा शुक्रवारी रात्री २.३० वा.च्या सुमारास बिबट्याने पळविल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मधलावाडा मार्सेलीन फर्नांडिस यांच्या अंगणात पाळीव कुत्रा साखळीने बांधून ठेवला होता.

बिबट्याने कुंपणावरून उडी घेत अंगणात बांधलेल्या कुत्र्यास पळविले व पुन्हा जंगलात धूम ठोकली. कुत्र्यांच्या भुंकण्याने कुटुंबीय जागे झाले, तत्पूर्वी कुत्रा जागेवर दिसला नाही. सीसीटिव्ही फुटेज तपासले असता, बिबट्याने कुत्रा पळविल्याचे दिसून आले, असे फर्नांडिस यांनी सांगितले. दरम्यान, वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली असता अधिकाऱ्यांनी २९ रोजी सकाळी भेट दिली व जागेची पाहणी केली.

नानोस्करवाड्यावर साधारण दहा दिवसांपूर्वी पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. स्थानिक तसेच देशी-विदेशी पर्यटक टेम्पल रोडचा वापर करीत असतात. त्या मार्गातील या घरांच्या अंगणात, बिबट्यापासून धोका निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT