Goa Apprenticeship Scheme Dainik Gomantak
गोवा

Goa Apprenticeship Scheme : खासगी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार जादा 1,500 रुपये स्टायपेंड : मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

world youth skills day 2023 : राज्यातील बेरोजगारी कमी करण्याबरोबरच शिक्षित तरुणांना कौशल्य शिक्षण देण्यासाठीच्या ‘अप्रेंटिसशीप’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून सुरू केलेल्या या कार्यक्रमात राज्यातील १५ हजार बेरोजगारांना अप्रेंटिसशीप देण्यात येणार आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना नियमित स्टायपेंडसह जादा 1500 रुपये देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार राजेश फळदेसाई, जेनिफर मोन्सेरात, रुडॉल्फ फर्नांडिस, महापौर रोहित मोन्सेरात उपस्थित होते.

तंत्रनिकेतनचा ‘मॉडेल’ म्हणून विकास

राज्यातील सर्व तंत्रनिकेतन (आयटीआय) ‘मॉडेल आयटीआय’ म्हणून विकसित करण्याचे स्वप्न टाटा टेक्नॉलॉजीसोबत साकारण्यात येणार आहे. पाच आयटीआय अद्ययावत केले जाणार आहेत. त्याद्वारे ‘इंडस्ट्री ४.०’ची तयारी करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

आज पणजीतील आयटीआयचे उदघाटन त्यांनी केले. साडेतीन कोटींचा हा प्रकल्प पीडब्ल्यूडीने साकारला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT