Goa Eco-Friendly Ganesha Dainik Gomantak
गोवा

Goa Eco-Friendly Ganesha: मूर्तीकारांसाठी सावंत सरकारची मोठी घोषणा! आता प्रत्येक मातीच्या मूर्तीवर मिळणार 'इतके' अनुदान; पर्यावरण संरक्षणाचा नवा पॅटर्न

Clay Ganesha Subsidy Goa: या योजनेअंतर्गत पात्र कारागिरांना प्रत्येक मातीच्या गणेशमूर्तीमागे २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यातील पारंपरिक मातीच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा हस्तकला, ग्रामीण व लघुउद्योग विकास महामंडळाने २०२६ सालासाठी विशेष आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कारागिरांना प्रत्येक मातीच्या गणेशमूर्तीमागे २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.

राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन मिळावे, मातीच्या मूर्ती बनविण्याची प्राचीन कला जतन व्हावी, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.

राज्यातील गणेशमूर्तीकारांनी या योजनेचा लाभ घेऊन पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे. या उपक्रमामुळे पारंपरिक कारागिरांना आर्थिक आधार मिळण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार असल्याचे मानले जात आहे.

नोंदणीकृत मूर्तीकारांना लाभ

या योजनेचा लाभ नोंदणीकृत मातीच्या मूर्तीकारांना मिळणार असून, अनुदानासाठी मूर्तीची उंची किमान एक फूट असणे आवश्यक आहे. प्रत्येक कारागिराला जास्तीत जास्त २५० मूर्तींसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार एका कारागिराला कमाल ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.

महामंडळाकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या आधारे ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक कारागिरांनी मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेसाठीचे अर्ज २४ जून ते २४ जुलै या कालावधीत उपलब्ध राहतील. अर्जाची किंमत ५० रुपये ठेवण्यात आली आहे. अर्ज महामंडळाच्या पणजी येथील पाटो कार्यालयात तसेच मडगाव येथील अपरांत विक्री केंद्रात उपलब्ध असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Government Job Fraud: दोषींची मालमत्ता जप्त करणार! तोतया आयुक्तप्रकरणी CM सावंत यांचे कडक कारवाईचे संकेत

America Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराची धक्कादायक घटना! 2 चिमुकले आणि 8 महिन्यांची गर्भवती महिला यांच्यासह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Horoscope: शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस ठरणार खास! देवीच्या कृपेनं 'या' राशींच्या आयुष्यात येणार यश, धनलाभाच्या संधीही मिळणार

Mental Health: पैसा, प्रसिद्धी अन् स्टेटसच्या शर्यतीत मन हरवतंय? मानसिक आरोग्याच्या संकटाची धक्कादायक बाजू

Viral Story: 21 पत्नी, पण 8 जणींचीच नावं लक्षात! भीक मागण्यासाठी रोज एका पत्नीला सोबत नेतो 'हा' बांगलादेशी; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT