Rooftop Solar Subsidy: सौर ऊर्जेत गोव्‍याची वाटचाल स्‍वयंपूर्णतेच्‍या दिशेने, 7.34 मेगावॅट ऊर्जा निर्मिती सुरू; 2027 पर्यंत 21 हजार 200 घरांवर सौर पॅनेल्सचे उद्दिष्ट

Goa Rooftop Solar: राज्यातील अनेक घरांच्या छतावर ७.३४ मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती सुरू झाली आहे. यासाठी सरकारने ४ कोटी २८ लाख रुपयांची मदत अनुदानाच्या रूपाने ४ हजार ७०० अर्जदारांना केली आहे.
Rooftop Solar Subsidy
Rooftop Solar SubsidyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यातील अनेक घरांच्या छतावर ७.३४ मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती सुरू झाली आहे. यासाठी सरकारने ४ कोटी २८ लाख रुपयांची मदत अनुदानाच्या रूपाने ४ हजार ७०० अर्जदारांना केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत ‘पंतप्रधान सूर्य घर : मोफत वीज’ या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या गोव्यातील अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यावेळी वरील माहिती देण्यात आली.

Rooftop Solar Subsidy
Goa Politics: गोवा मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्‍यता, दिल्लीत पार पडली बैठक; CM सावंतांना वगळता सर्व मंत्र्यांचे घेणार राजीनामे

या बैठकीला ऊर्जा सचिव प्रसाद लोलयेकर, गोवा ऊर्जा विकास यंत्रणेचे सदस्य सचिव संजीव जोगळेकर, पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, नियोजन व सांख्यिकी संचालक विजय सक्सेना, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, वीज मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस आदी उपस्थित होते.

या बैठकीत सांगण्यात आले की, सदर योजनेअंतर्गत २०२७ पर्यंत गोव्याचे उद्दिष्ट २१ हजार २०० घरांवर सौर पॅनेल्स बसवण्‍याबरोबरच ६५ मेगावॅट स्वच्छ व हरित ऊर्जेचे आहे. या उपक्रमाद्वारे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी शाश्‍‍वत ऊर्जा पुरवण्याचा शासनाचा निर्धार आहे.

गोव्याच्‍या प्रगतीकडे पाहता सध्या ४ हजार ७०० हून अधिक प्रकरणांना व्यवहार्यता मंजुरी देण्यात आली असून एकूण ७.३४ मेगावॅट सौरविद्युत निर्मिती सुरू झाली आहे. योजनेच्या अनुषंगाने आत्तापर्यंत ४.२८ कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.

Rooftop Solar Subsidy
Goa Taxi Issue: कोणी म्हणाले जीवन संपवू, कोणी म्हणाले दारावर भीक मागू; मायकल लोबो अन् टॅक्सी चालकांत उडाले खटके

या मुद्यांवर झाली सविस्तर चर्चा

  • २५ वर्षांच्या देखभालीच्या हमीसह कंत्राटदारांची जलद नियुक्ती

  • नवीन व सध्‍याच्‍या इमारतींमध्ये विशेषतः हॉटेल्स, शासकीय कार्यालये आणि निवासी संकुलांमध्ये ‘रूफटॉप’ सौरऊर्जा प्रणालींचा अवलंब

  • गोवा मोफत वीज योजना हळूहळू समाप्त करून ती ‘पंतप्रधान सूर्य घर : मोफत वीज’ योजनेत समाविष्‍ट करणे.

  • काही विशिष्ट क्षेत्रांसाठी ‘रूफटॉप’ सौर बसवणे सक्तीचे करण्यावर भर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com