Anjunem Dam Dainik Gomantak
गोवा

Anjunem Dam: चारही दरवाजे उघडले, अंजुणे धरणातून विसर्ग सुरू; धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Anjunem Dam Updates: गेल्या काही दिवसांपासून सत्तरी तालुक्यासह परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने केरी-सत्तरी येथील अंजुणे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

Sameer Panditrao

वाळपई: गेल्या काही दिवसांपासून सत्तरी तालुक्यासह परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने केरी-सत्तरी येथील अंजुणे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी ५.१५ वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाचे चारही दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत.

धरणातील सध्याचा पाणीसाठा ९१.१५ मीटर असून, एकूण विसर्ग ९.०० क्यूसेक्स दराने करण्यात येत आहे. शुक्रवारी धरण परिसरात ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंतचा एकूण पाऊस २,५२६.७० मिलीमीटर इतका झाला आहे.

धरणातून सुरू झालेल्या विसर्गामुळे कयटी नदीमार्गे वाळवंटी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी, वाळवंटी नदीची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे.

अंजुणे धरणातून पाणी सोडले की, वाळवंटी नदी परिसरात दरवर्षी पुराचा संभाव्य धोका निर्माण होतो. जर याचवेळी चोर्ला घाटातील मोठ्या पावसामुळे वाळवंटी नदीला आणखी पाणी मिळाले, तर कयटी आणि वाळवंटी या दोन्ही नद्यांची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पुराचा धोका ओळखून सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. धरण परिसर, नदी किनाऱ्यावरील गावांतील नागरिक, शेतकरी व मच्छीमार बांधवांनी नदीकाठी जाऊ नये, तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

अंजुणे धरणाचे चारही दरवाजे खुले केले असून पूर्ण क्षमतेने विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, कोणतीही आपत्कालीन स्थिती उदभवल्यास लोकांनी तात्काळ स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जलसंपदा खात्याने केले आहे.

अंजुणे धरण सद्यस्थिती

पाणीसाठा : ९१.१५ मीटर

विसर्ग : ९.०० क्यूसेक्स

आजचा पाऊस : ४६ मिमी

एकूण पावसाची नोंद : २५२६.७० मिमी

विसर्ग वेळ : संध्याकाळी ५.१५ वाजता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: राज्यात क्रीडापटूंसाठी 4 टक्के पदे राखीव

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

Goa Politics: खरी कुजबुज; कामत अन् तवडकर

Shirguppi Ugar: गर्भवती पत्नीला कारने उडवले, अपघात भासवून केला खून; संशयित पतीला अटक

SCROLL FOR NEXT