Flood Dainik Gomantak
गोवा

CEEW Study: गोव्यासह 12 राज्यांना पुरस्थिती, चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका; नव्या अभ्यासातील निष्कर्ष

चक्रीवादळाचा आधीच इशारा देणाऱ्या प्रणालीत किनारी राज्ये अग्रेसर

गोमंतक ऑनलाईन टीम

CEEW Study: पब्लिक पॉलिसी थिंक टँक असलेल्या कौन्सिल ऑन एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट (CEEW) च्या नवीन अभ्यासात पुरस्थितीचा सर्वाधिक धोका असलेल्या 12 राज्यांमध्ये गोव्याचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे, गोव्याला चक्रीवादळांचा धोका देखील आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

या 12 राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि बिहार यांचा समावेश आहे. तथापि, यातील केवळ उत्तर प्रदेश, आसाम आणि बिहार या तीन राज्यांमध्ये पूर पूर्व इशारा प्रणाली उपलब्ध असल्याची माहिती आहे.

आंध्र प्रदेश, ओडिशा, गोवा, कर्नाटक, केरळ आणि पश्चिम बंगाल ही राज्ये चक्रीवादळाचा आधीच इशारा देणाऱ्या प्रणालीत अग्रेसर आहेत.

प्रकल्पाच्या फेज-1 अंतर्गत फक्त ओडिशा आणि आंध्र प्रदेशचा समावेश होता. फेज-2 मध्ये, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि केरळमध्ये चक्रीवादळ इशारा केंद्रे स्थापन करण्यासाठी निधी जारी करण्यात आला.

आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी राज्ये आहेत. बिहार, आसाम, झारखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये चक्रीवादळाचा पूर्व इशारा देण्याची यंत्रणा उपलब्ध नाही.

तथापि, दोन टप्प्यांतर्गत प्रदान केलेल्या ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांच्या तुलनेत गोवा राज्य अद्यापही निधीच्या वापरामध्ये अधिक चांगले काम करू शकते, असे या अभ्यासात आढळून आले आहे.

दरम्यान, पुराचा उच्च धोका असूनही आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम ही पूर इशारा प्रणाली (EWS) च्या बाबतीत सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये आहेत. तर हिमाचल प्रदेश जिथे सध्या मोठ्या प्रमाणावर पुर आला आहे. तिथे EWS ची उपलब्धता सर्वात कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT