CM Pramod Sawant: गोव्यातील सर्व ITI मॉडेल म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

सरकारी विभागांसह खासगी कंपन्यांत 9 हजार युवकांचा एक वर्षांचा अप्रेंटिसशिपचा करार करणार
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: राज्यातील सर्व आयटीआय मॉडेल आयटीआय म्हणून विकसित करण्याचे आमचे स्वप्न आहे. हे स्वप्न टाटा टेक्नॉलॉजीसोबत साकार करणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने पाच आयटीआय अद्ययावत केले जाणार आहेत.

त्याद्वारे इंडस्ट्री 4.0 ची तयारी गोवा करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

CM Pramod Sawant
Subhash Phaldesai: मंत्री सुभाष फळदेसाई संतापले; स्वतःच्याच खात्याने शेवटच्या मिनिटाला दिले निमंत्रण

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीशी 160 कोटींचा करार केला जाणार आहे. 230 कोटीहून अधिक आम्ही कौशल्य विकासासाठी गुंतवणार आहोत.

ते म्हणाले, प्रत्येक हाताला काम द्यायचे असेल तर प्रत्येक हाताला कौशल्य शिकवले पाहिजे. गोव्याच्या प्रत्येक युवकाला कौशल्य शिकवणार. विविध क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाईल. केवळ प्रशिक्षण देऊन थांबणार नाही तर त्यांना प्लेसमेंटही दिली जाईल.

आज पणजीतील आयटीआचे उद्घाटन केले. साडेतीन कोटीचा प्रकल्प पीडब्ल्यूडीने केला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जॅक्वार, डायकिन, यशस्विनी, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Goa Power Tariff Hike: गोवेकरांना बसणार वीज दरवाढीचा 'शॉक'; या महिन्यापासून महागणार वीज

जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून शनिवारी पणजीत 9 हजार जणांना अप्रेंटिसशिपची पत्रे देण्यात आली. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारने बेरोजगार तरूणांकडून अप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागवले होते.

दरम्यान, राज्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रात 15 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी आहेत. तथापि, अर्ज केवळ 9 हजारांपर्यंत आले होते. या युवकांना सरकारमधील काही विभागांत तसेच खासगी कंपन्यांमध्ये एक वर्षासाठी अप्रेंटिसशिपसाठीची पत्रे, आज देण्यात आली.

या युवकांना संबंधित विभाग, कंपनीसोबत एक वर्षाचा करार करावा लागेल. या अप्रेंटिसशिपकाळात प्रशिक्षणार्थ्यांना महिन्याला 8 हजार ते 13 हजार रूपपे स्टायपेंड दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

BVSc and AH Degree Course Goa
Section 39A Land Conversion
Memory Exercises
Goa Budget Education
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com