Canacona: पैंगीण पंचायत क्षेत्रातील युवा शेतकरी सचिन नाईक हा काणकोणमध्ये ‘बेस्ट नॅचरल फार्मर’ बनला आहे. हल्लीच कृषी खात्याने बारा तालुक्यांतील शेतकऱ्यांची या क्षेत्रासाठी निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान केला.
सचिन नाईक हा युवक गेली दहा वर्षे आपल्या 5 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त शेतजमिनीत भाजीचे पीक घेत आहे. नावीन्याचा ध्यास घेत दरवर्षी नवीन पिकाची लागवड चक्राकार पद्धतीने तो करतो. कधी कोकण दुधी, कधी झेंडू फुलांची लागवड तर कधी भेंडी, काकडीचे पीक घेतो. सध्या त्याने भेंडीची लागवड केली आहे.
पीक घेण्यासाठी सचिन कुठल्याच रासायनिक खताचा किंवा औषधांचा वापर करीत नाही हे विशेष. खत म्हणून बायोफर्टिलायझर, गांडूळ खत, शेण खताला तो प्राधान्य देतो. त्याने घेतलेली पिके पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळेच त्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे विभागीय कृषी अधिकारी नाईक गावकर यांनी सांगितले.
सचिन नाईक, युवा शेतकरी-
रासायनिक खतांची मात्रा देऊन पीक घेण्याकडे सध्या कल वाढला आहे. मात्र आपण नैसर्गिक खत वापरतो. विभागीय कृषी अधिकारी किर्तीराज नाईक गावकर यांनी नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करून सर्व प्रकारचे साहाय्य केले. त्यामुळेच कृषी खात्याचा ‘बेस्ट नॅचरल फार्मर’ पुरस्कार प्राप्त झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.