Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Literacy: अभिमानास्पद आणि ऐतिहासिक! गोवा राज्य 100 टक्के साक्षर; मुख्यमंत्री सावंतांची माहिती

Goa Literacy 100 Percent Literate State: मुख्यमंत्री सावंत यांनी ही घोषणा करताना यामुळे राज्याच्या विकासात आणि सामाजिक प्रगतीला याचा फायदा होईल, असे म्हटले आहे.

Pramod Yadav

Goa Became 100 Percent Literate State

पणजी: गोवा राज्य १०० टक्के साक्षर झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. याबाबत अधिकृत घोषणा गोवा राज्य स्थापना दिनाच्या कार्यामात ३० मे रोजी केली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. राज्याने १०० साक्षरतेचे उद्दीष्ट पूर्ण केल्याने ही राज्यासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बाब मानली जात आहे. गेल्या वर्षी सांगितलेल्या १९ डिसेंबर २०२५ पूर्वीच राज्याचे हा टप्पा पूर्ण केला आहे. (First state in the India achieved 100% literacy rate)

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर (बुधवारी, २८ मे) प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली. गोव्याने गाठलेली १०० टक्के साक्षरता राज्यातील शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि शासन यांच्यातील समन्वयाचे फलित आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

तसेच, राज्य साक्षरतेच्या बाबतीत देशात एक आदर्श ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. इतर राज्यांच्या आकारमान आणि लोकसंख्येच्या तुलनेत गोवा लहान राज्य असल्याने गोव्यासाठी १०० टक्के साक्षरतेचे ध्येय गाठणे सहज शक्य असल्याचे सावंत म्हणाले होते.

१९ डिसेंबर पूर्वीच १०० टक्के साक्षरतेचे ध्येय पूर्ण

गेल्या वर्षी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा १९ डिसेंबर २०२५ पर्यंत १०० टक्के साक्षर होईल, असे आश्वासन दिले होते. दरम्यान, सहा महिन्यापूर्वीच गोव्याने हे ध्येय गाठले आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी ही घोषणा करताना यामुळे राज्याच्या विकासात आणि सामाजिक प्रगतीला याचा फायदा होईल, असे म्हटले आहे.

केंद्राच्या तीन प्रकल्पांना मंजुरी

पर्वरी टाऊन स्क्वेअरचा विकास, पर्वरी खाडीचे शुभोभीकरण आणि फर्मागुडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे संग्रहालय अशा तीन केंद्राच्या प्रकल्पांना गोवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या तिन्ही प्रकल्पामुळे राज्याचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार असल्याचे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

SCROLL FOR NEXT