Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: बुधवार ठरला 'ब्लॅक डे', एकाच दिवशी 4 अपघाती बळी; 7 जण जखमी

Goa Accident News: दसरोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी राज्यात तीन वेगवेगळ्या अपघातांत ४ जणांना प्राण गमवावे लागले तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत.

Sameer Amunekar

फोंडा/कुडचडे/वास्को : दसरोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी राज्यात तीन वेगवेगळ्या अपघातांत ४ जणांना प्राण गमवावे लागले तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे बुधवार हा ‘ब्लॅक डे’ ठरला. वास्को, सांगे, कुडचडे,रामनगर येथील अपघातांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. यामध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तसेच बाणस्तारीतील अपघातात ७ जखमी झाले.

वास्को-तारीवाडा, येथील फ्लायओव्हरवरील भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. नवेवाडे-येथील महेश तुळसकर हे मोटरसायकलवरून सडाच्या दिशेने जात होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी मनस्वी प्रवास करत होती. फ्लायओव्हरवर येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका स्कूटरची त्यांच्या मोटरसायकलला धडक बसली.

या अपघातात मनस्वी तुळसकर गंभीर जखमी झाल्या. त्यांना गोमेकॉत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महेश तुळसकर आणि दुसऱ्या स्कूटरवरील प्रवासीदेखील जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, रामनगर-गोवा मार्गावरील तिनईघाटजवळ बुधवारी सकाळी अपघात झाला.

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. हैदराबादहून गोव्याला निघालेल्या विजयानंद या खासगी प्रवासी बसने मँगनीजने भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना हा अपघात झाला.

वडिलांचे श्राद्ध करण्यासाठी जात होता...

काकोडा-माधेगाळ येथील तिंबलो गॅरेजजवळ ‘केटीएम २०० ड्यूक’ ही दुचाकी आणि चारचाकीत समोरासमोर टक्कर झाली. यात वडिलांचे श्राद्ध असल्यामुळे कामावरून रात्री उशिरा घरी परतत असताना वालशे-सांगे येथील प्रसाद चंद्रकांत नाईक (२५) या युवकाचा मंगळवारी उत्तररात्री (१२.२० वा.) अपघाती मृत्यू झाला.

त्याला उपचारासाठी नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. प्रसाद हा कळंगुट येथे पर्यटक बस चालविण्याचे काम करीत होता. बुधवारी वडिलांचे तिथीश्राद्ध असल्यामुळे तो काम आटाेपून सांगेच्या दिशेने येत होता. त्याच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत हलाकीची असून घरी वृद्ध आई, विवाहित बहीण असा परिवार आहे.

वृद्ध चिरडला टॅंकरखाली

मुंबईतील ७० वर्षीय मधुकर परब यांचा सांकवाळ येथे टँकरखाली चिरडून मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या परब यांना चिखली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा तिथे मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa crime: मुलीशी लग्नास विरोध केल्यानेच खून; चिकणे-कुडणेतील महिलेच्या हत्येचा झाला उलगडा, संशयिताला मुंबईत ठोकल्या बेड्या

Tri Ekadash Yog 2026: अवकाशात घडणार मोठी उलथापालथ! मंगळ-गुरुच्या संयोगानं बनतोय 'त्रिएकादश योग', 5 राशींचं नशीब पालटणार; धनलाभाची सुवर्णसंधी

Viral Video: "तो प्रवासी माझाच!" भररस्त्यात सुरू झाली रिक्षावाल्यांची 'WWE'; प्रवाशाने ठोकली धूम, व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

Cricket Rules: 100 मीटरच्या षटकाराला 8 धावा, 3 विकेट्स घेणाऱ्याला एक्स्ट्रा ओव्हर; क्रिकेटच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल?

Goa Accident Death: मॉर्निंंग वॉक दरम्यान काळाचा घाला; पत्रादेवी येथे 65 वर्षीय वृद्धाला कंटेनरने चिरडले, चालकाला रत्नागिरीतून अटक

SCROLL FOR NEXT