Goa Education: 6 वर्षे पूर्ण झालेल्यांनाच यापुढे पहिलीमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

CM Pramod Sawant On Goa Education: ज्या मुलांना सहा वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांनाच नवीन शैक्षणिक धोरणानुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून पहिल्या इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे.
CM Pramod Sawant On Goa Education
CM Pramod Sawant On Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: ज्या मुलांना सहा वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांनाच नवीन शैक्षणिक धोरणानुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून पहिल्या इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे. या नवीन निर्णयामुळे राज्यात सुमारे ४ हजार मुलांना पहिलीत प्रवेशापासून वंचित राहावे लागेल

परंतु त्यानंतरच्या म्हणजेच २०२७ वर्षापासून ही सर्व तूट भरुन निघणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

फाळवाडा कुडणे येथील सरकारी प्राथमिक शाळेला माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

CM Pramod Sawant On Goa Education
Dussehra in Goa: 'वडी' आणि गोडशाचा नैवेद्य, 'आपट्याची पानं' वाटून समृद्धीचं स्वागत; वाचा कसा असतो गोव्याचा दसरा

यावेळी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, कुडणेचे सरपंच बाबला मळीक, उपसरपंच दिपिका नाईक, पंचसदस्य राजन फाळकर, पूर्वा मळीक, सुनिधी कामत, दामोदर पेठकर, श्रीकांत चिकणेकर, सचिव सुजाता मोरजकर, शाळेचे प्रमुख विद्यानंद गावकर, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष अंकिता च्यारी आदींची उपस्थिती होती.

CM Pramod Sawant On Goa Education
Goa Congress: प्रदेशाध्‍यक्ष बदलावरुन काँग्रेसमध्ये रणकंदन! पाटकर-चोडणकर गटांकडून पक्षावर दबावतंत्राचा अवलंब; सामूहिक राजीनाम्‍यांचा इशारा

ही पर्रीकरांची भेट

फाळवाडा कुडणे येथील शाळा म्हणजे मनोहर पर्रीकर यांनी फाळवाड्यासाठी दिलेली एक भेट आहे. त्यांच्याच प्रयत्नामुळे या शाळेला मोठे व आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. त्यांचे नाव या शाळेला सुचवून त्याचे नामकरण करताना मनाला मोठे समाधान वाटत असल्याचे पंचसदस्य राजन फाळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com