Karmal Ghat Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Karmal Ghat Traffic Jam: करमल घाटात कंटेनर पलटी; वाहतूक इतर मार्गाने वळवली

Karmal Ghat Traffic Jam: घाटाच्या रुंदीकरणाचा मुद्दा अजूनही रखडलेलाच आहे

Kavya Powar

Karmal Ghat Traffic Jam: करमल घाट आणि अपघात हे समीकरण आता पक्के झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. घाटातील वळणावर हमखास अपघातांच्या घटना घडत असतात.

यामध्ये घाटाच्या रुंदीकरणाचा मुद्दा अजूनही रखडलेलाच आहे. आज या घाटात कंटेनर ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे.

वाहन क्रमांक GJ12BV 8374 कंटेनर पाईप घेऊन कारवार हून मडगावच्या दिशेने जात असताना करमल घाटात कुंकळ्ळीच्या बाजूने उतरणीवर कंटेनर आडवा झाल्याने काही पाईप रस्त्यावर कोसळले त्यामुळे हमरस्ता वाहतूकीसाठी बंद राहिला.

ही घटना सोमवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आज सकाळी ८.३० वाजता पाईप बाजूला काढून हमरस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. ही घटना घडल्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी काही प्रमाणात वाहतूक बाळ्ळी, काबदेराम, खोला ते काणकोण अशी वळवली.

रस्त्याच्या मधोमध कंटेनर पलटी झाल्याने बराच वेळ घाटात वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

या अपघातामुळे घाटाच्या रुंदीकरणाचा प्रलंबित मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दरम्यान, 20 जूनला घाटातील एका तीव्र वळणावर कार व एलपीजी गॅसवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात कार दरीत कोसळल्याने कारमधील एका युवकाचा जागीच मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली.

यामुळे घाट रस्त्याच्या रुंदीकरणावर सरकारने गांभीर्याने विचार करून त्वरित काम सुरू करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT