Tamnar Project : वृक्षतोडीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्र ; तन्मार प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा विरोध

चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लागणारी झाडे कापण्यासाठी परवानगी वेळेत देण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
Tamnar Project
Tamnar ProjectDainik Gomantak

Goa tamnar project : तम्नार वीज प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा वाढता विरोध आहे. यामुळे या प्रकल्पाची गरज उद्योग क्षेत्राकडून सरकारला पटवून देण्यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या स्टरलाईट पावरकडून प्रयत्न सुरू केले आहेत.

या पत्रात त्यांनी पश्चिम ग्रीडकडून ४०० केव्ही वीज वाहिनी राज्याला वीज देते. वादळ वा नैसर्गिक आपत्तीमुळे त्या वाहिनीत बिघाड झाला, तर तीन दिवस राज्य अंधारात बुडेल, याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे, की ऊर्जा सुरक्षा ही राज्यासाठी महत्त्वाची आहे.

या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी लागणारी झाडे कापण्यासाठी परवानगी वेळेत देण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

Tamnar Project
Goa Student: बहिस्थ विद्यार्थ्यांची बेशिस्त वाढली; मंडळाकडे तक्रारी

दक्षिण गोव्यात ४०० केव्ही वीज वाहिनीतून वीज आणणे, हे यासाठी आवश्यक आहे. सध्याच्या वीज वाहिनीची देखभाल दुरुस्तीही करता येत नाही.

गोवा तम्नार प्रकल्पामुळे राज्याला ऊर्जा सुरक्षा मिळेल. पश्चिम ग्रीडकडून येणारी वीज खंडित झाला, तरी राज्याच्या वीज वितरणावर परिणाम होणार नाही.

Tamnar Project
South Goa Recruitment: दक्षिण गोव्यातील 147 रिक्त पदांसाठी पुन्हा भरती

सध्या दक्षिण गोव्याला २२० केव्ही वीज नागझारी फोंडा वाहिनीतून मिळते. दक्षिण गोव्यातील शेल्डे ते उत्तर गोव्यातील म्हापसा या दरम्यान या प्रकल्पांतर्गत ४४० केव्हीची वीज वाहिनी घालण्यात येणार असल्याने कोणत्याही एका बाजूचा वीज पुरवठा बंद पडला तरी राज्यातील वीज पुरवठा खंडित होणार नाही.

मनोऱ्यांसाठी वृक्षतोड

स्टरलाईचे उपाध्यक्ष निनाद पिटले यांच्या सादरीकरणाचा हवाला देत पत्रात म्हटले आहे, की केवळ मनोरे उभारण्याच्या ठिकाणी वृक्षतोड करावी लागेल, वाहिन्यांच्या ठिकाणी उंच वृक्षांची केवळ छाटणी करावी लागणार आहे.

प्रकल्प मंजूर झाल्यानंतर अंमलबजावणीत बराच वेळ गेला आहे. त्यामुळे त्यांना सर्व परवानग्या वेळेत मिळतील याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com