Karaswada Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: करसवाडा हायवेवर अपघाती सत्र!! दुचाकीची ट्रकला धडक; हेल्मेटमुळे स्थानिक थोडक्यात बचावला

Karaswada Accident News:करसवाडा येथील नेशनल हायवेवर झालेल्या या अपघातात दीपक कोरगावकर नावाचा स्थानिक जखमी झाला आहे

Akshata Chhatre

करसवाडा: गोव्यात अपघातांचे सत्र वाढत चालले आहे. शुक्रवार (दि. २२) रोजी रात्रीच्यावेळी एका भीषण अपघातात स्थानिकाला जबर मार बसला आहे. करसवाडा येथील नेशनल हायवेवर झालेल्या या अपघातात दीपक कोरगावकर नावाचा स्थानिक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीपक कोरगावकर हा पणजीहून कोलवाळच्या दिशने येत असताना त्याने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली.

शुक्रवारी रात्री १०:३०-११च्या सुमारास दीपक कोरगावकर नावाचा स्थानिक पणजीहून कोलवाळला जात असताना त्याची ट्रकला धडक बसली.

३७ वर्षीय दीपकने हेल्मेटचा वापर केला असल्याने त्याच्या डोक्याला मार बसला नाही मात्र त्याच्या कानाला तसेच हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिकांच्या तत्परतेमुळे दीपकवर वेळीच उपचार सुरु झाले, सध्या तो म्हापशातील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

करसवाडा हायवे धोकादायक?

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार करसवाडा हायवेवर रात्रीच्यावेळी बरेच ट्रक उभे असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रात्रभर तसेच अनेकवेळा दिवसेंदिवस ही अवजड वाहनं उभी असतात, नेशनल हायवे असल्याने गाड्या इथे सुसाट वेगाने येतात आणि अनेकवेळा उभी अवजड वाहनं दिसून येत नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत स्थानिकांना होणारा हा त्रास सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT