Mapusa District Hospital: शवागारातील दोन केबिनना गळती; जिल्हा रुग्णालयात लोकांची गैरसोय

Mapusa News: नवीन केबिनसाठी ‘साबांखा’ला प्रस्ताव
Mapusa News: नवीन केबिनसाठी ‘साबांखा’ला प्रस्ताव
Mapusa District HospitalDainik Gomantak
Published on
Updated on

जिल्हा रुग्णालयामधील शवागारातील दोन केबिनना गळती लागल्याने त्या वापरण्यायोग्य नाहीत. एका केबिनमध्ये अनोळखी मृतदेह पडून आहेत. शवागाराची इतरत्र सुविधा नसल्यामुळे म्हापसा शहर तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांची बरीच गैरसोय होत आहे.

जिल्हा रुग्णालयामधील शवागारातील दोन केबिनना गळती लागून ती नादुरुस्त झाली आहेत, तर एका केबिनमध्ये चार मृतदेह ठेवले आहेत. या नादुरुस्त केबिनच्या जागी नवीन केबिन उपलब्ध करण्यात यावी यासाठी इस्पितळ प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याला अंदाजपत्रकासह प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, पेडे-म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात सरकारने शवागाराची व्यवस्था केलेली आहे. या शवागारात एकाचवेळी १२ मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी मॉर्गमध्ये तीन केबिन असून प्रत्येकी चार प्रमाणे मृतदेह त्या ठिकाणी ठेवले जातात. मात्र, गेल्या महिन्यापासून तीन पैकी दोन मॉर्ग केबिनमध्ये गळतीची समस्या उद्भवली आहे.

गळती लागून हे दोन्ही केबिन नादुरुस्त झाल्यामुळे त्यामध्ये मृतदेह ठेवणे शक्य होत नाही, तर एक केबिन कार्यरत असून त्यात चार अनोळखी मृतदेह पडून आहेत. २०२२ ते २०२४ या कालावधीत हे मृतदेह ठेवलेले आहेत; पण त्यांची पोलिस किंवा जिल्हा रुग्णालयाकडून विल्हेवाट लावलेली नाही.

Mapusa News: नवीन केबिनसाठी ‘साबांखा’ला प्रस्ताव
Mapusa News: कचरा टाकल्यास म्हापसा पालिका ठोठावणार दंड

साईनाथ राऊळ, नगरसेवक

शवागाराची सुविधा खंडित झाल्यामुळे एखादा मृतदेह कुठे ठेवायचा, यासाठी अनेकांना धावपळ करावी लागते. गोमेकॉमध्ये मृतदेह न्यायचा झाल्यास तिथे प्रक्रियेसाठी चार तासांचा अवधी लागतो व पुन्हा मृतदेह आणण्याकरिता तितकाच अवधी जातो. त्यामुळे बार्देश व परिसरातील लोकांना जिल्हा रुग्णालय सर्वदृष्टीने सोयीचे ठरते. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व उपसभापतींनी यात लक्ष घालून समस्या दूर करावी.

Mapusa News: नवीन केबिनसाठी ‘साबांखा’ला प्रस्ताव
Mapusa District Hospital: 'या' रुग्णालयात सुविधांचा अभाव! रुग्णांची गैरसोय

दुरुस्ती करूनही पुन्हा ये रे माझ्या मागल्याच!

गळती लागलेल्या या शवागाराच्या केबिनबाबत जिल्हा रुग्णालयाकडून कल्पना मिळल्यावर संबंधित कंपनीने हे केबिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला; पण वारंवार दुरुस्त करूनही पुन्हा गळती लागत असल्याने हे दोन्ही केबिन दुरुस्त होणे शक्य नसल्याची माहिती कंपनीने रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर नवीन केबिनचा प्रस्ताव रुग्णालयाकडून सरकारला सादर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com