Goa Accident Cases
Goa Accident Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Cases: अपघात कसे रोखायचे सांगा; जनतेचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न!

दैनिक गोमन्तक

Goa Accident Cases: वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता सरकारने रस्ता वाहतूक सुरक्षा व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे ठरविले असून त्यासाठी येत्या शुक्रवारी 21 ऑक्टोबरला पणजीत मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सकाळी 10 जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यास खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित रहाणार असल्याचे वाहतूक उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी सांगितले. या वेळी वाहतूक संचालक राजेंद्र सातार्डेकर , सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता डी. सी. गुप्ता व अधीक्षक अभियंता (राष्ट्रीय महामार्ग विभाग) एलन परेरा उपस्थित होते.

गोव्यात नव्या रस्त्याची आणि पुलांची कामे झाली असून वाहतूकही वाढली आहे. अपघातांचे प्रमाणही गतवर्षीच्या तुलनेत खूप वाढले आहे. यावर एक ठोस आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव समोर आल्याने जनसुनावणी घेऊन सर्व समावेशक उपाययोजना आखायच्या आहेत. त्यासाठी लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील, असे ते म्हणाले.

चूक कुणाची उघडपणे बोला: सातार्डेकर

काही रस्ते असुरक्षित असल्याचा नेहमी आरोप होतो. त्यात कोणती दुरुस्ती हवी, ते कळवावे. ब्लॅक स्पॉट लक्षात आणून द्यावेत. चूक कोणाची ते उघडपणे बोलावे, असे आवाहन वाहतूक संचालक राजेंद्र सातार्डेकर यांनी केले.

वाहन अपघातांची खरी कारणे उघड व्हायला हवीत. वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई हवी, तर जनतेनेच सुचवावे असे ते म्हणाले. दुचाकी चालकांबरोबर मागे बसणाऱ्या स्वारालाही हेल्मेट सक्ती असावी का, असे त्यांना विचारले अस्ता त्यावर जनतेने कौल द्यावा, असेही ते म्हणाले.

30 सप्टेंबरपर्यंत 2244 अपघात, 179 जीवघेणे

यंदाच्या वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत 2244 एवढे अपघात झाले. ज्यात जीवघेण्या 179 अपघातांत 179 जणांना मरण आले. याच 9 महिन्याच्या काळासाठी गतवर्षी 153 मृत्युमुखी पडले होते. यंदा त्यात 42 ने वाढ झाली. या वर्षी 3 लाख 87 हजार 629 जणांना चलन देण्यात आले. त्यातून 13 कोटी 46 लाख 11 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT