Goa road accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: बेजबाबदार चालकांचा कहर; चुकीच्या दिशेने आलेल्या कारने घेतला तरुणाचा बळी

Mopa road accident: चारचाकी वाहन चालक चुकीच्या मार्गाने आल्यामुळे त्याची दुचाकीला जबरदस्त ठोकर बसली आणि दुचकीवर असलेला सुहास नारुलकर गंभीर जखमी झाला आणि तो जागीच ठार झालाय

Akshata Chhatre

मोपा: कासारवराणे या ठिकाणी शनिवारी (दि. १०) रात्री दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात होऊन सुहास नारुलकर या युवक जागीच ठार झालाय. अपघातानंतर समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार चारचाकी वाहन चालक चुकीच्या मार्गाने आल्यामुळे त्याची दुचाकीला जबरदस्त ठोकर बसली आणि दुचकीवर असलेला सुहास नारुलकर गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झालाय.

अपघात झाला कसा?

शनिवारी रात्री MH 04 FF 3447 अशी नंबरप्लेट असलेली गाडी चांदेल येथून कासारवराणेच्या दिशेने जात होती आणि याच दरम्यान मयत सुहास नारुलकर हा देखील कामावरून घरी परतत होता.

महाराष्ट्रातील ही चारचाकी गाडी चुकीच्या दिशेने येत होती आणि तिने सुहास नारुलकरच्या गाडीला जबरदस्त धक्का दिला, यात सुहास नारुलकर गंभीर जखमी झाला आणि मदत मिळण्याच्या आतच त्याला मरण आलं. मोपा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, या आपघातचा पंचनामा केला आहे.

स्थानिकांकडून अपघाताचा संताप व्यक्त :

कासारवराणे येथे झालेल्या अपघताचा स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. आजच्या घडीला गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपघातांच्या घटना सुरूच आहे, मात्र याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही. गोव्यात रात्री-अपरात्री लोकं दारू पिऊन गाडी चालवत आहेत का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. खुशाल मनात येईल त्याप्रमाणे गाडी चालवणाऱ्या चालकांवर पोलिस किंवा वाहतूक अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही. काही गाड्यांना नंबरप्लेट सुद्धा नाही अशा चालकांवर कारवाई केली जावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT