Mumbai Goa Highway Accident: मुंबईतून सिंधुदुर्गात जाणाऱ्या खासगी बसचा अपघात, 3 प्रवाशांचा मृत्यू, 30 जखमी

Mumbai Goa Highway Fatal Accident: यातून ३५ प्रवासी प्रवास करत होते. पनवेल तालुक्यातील कर्नाळा घाटात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली.
Private bus from Mumbai to Sindhudurg met with accident
Mumbai Sindhudurg Bus AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

रायगड: मुंबईतून सिंधुदुर्गला निघालेल्या खासगी बसचा मुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघाताता तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीसहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर कळंबोळी येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री अकराच्या सुमारास कर्नाळा घाटात हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस (एमएच 47, वाय 7487) मुंबईतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे निघाली होती. यातून ३५ प्रवासी प्रवास करत होते. पनवेल तालुक्यातील कर्नाळा घाटात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला तर, ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कळंबोळी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Private bus from Mumbai to Sindhudurg met with accident
Ponda Murder Case: मेव्हण्याने दारुच्या नशेत केला दाजीचा खून; कोडार - फोंडा येथील घटनेने खळबळ

कर्नाळा घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली. या दुर्घटनेत एक लहान मुलीचा हात कापल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, जखमी प्रवाशांपैकी काहींची प्रकृती स्थिर असून, काहीजण अद्याप गंभीर असल्याचे समजतेय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर क्रेनच्या मदतीने बस हलविण्यात आली.

Private bus from Mumbai to Sindhudurg met with accident
Bicholim: लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर 'मोगरी'चा दरवळ मंद; फुलांना मागणी घटली

मालवाहू ट्रकला आग

मुंबई गोवा महामार्गावर अपघातच्या वारंवार घटना सुरुच असल्याचे चित्र आहे. सोमवारी रात्री महामार्गावर एका मालवाहू ट्रकला अचनाक आग लागली. ट्रकमध्ये कोणता माल होता, याबाबत माहिती मिळाली नाही. दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही पण, आगीत ट्रकचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com