Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच; बांबोळीत भरधाव कारला दुचाकीची जोरदार धडक

Goa Accident: बांबोळीत गेल्‍या रविवारी दोघांचा अपघातात मृत्‍यू झाल्‍याची घटना ताजी असतानाच आज तिथेच झालेल्या अपघातात रोहन खेडेकर (२५, ठाणे-मुंबई) या युवकाला आपला प्राण गमवावा लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून मृत्यूचे तांडव थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही. बांबोळीत गेल्‍या रविवारी दोघांचा अपघातात मृत्‍यू झाल्‍याची घटना ताजी असतानाच आज तिथेच झालेल्या अपघातात रोहन खेडेकर (२५, ठाणे-मुंबई) या युवकाला आपला प्राण गमवावा लागला.

आगशी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी दुपारी सुमारे दीडच्‍या सुमारास घडला. बांबोळी येथील एसएजी स्टेडियम समोरील उड्डाणपुलाच्या उतरणीवर चुकीच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात रोहन खेडेकर याने आपली दुचाकी (एमएच ४८ एएस ८६७१) भरधाव वेगाने चालवत समोरून येणाऱ्या चारचाकीला (जीए ०६ टी ८६१६) ठोकरली. त्यात तो उड्डाणपुलाच्या भिंतीवर आढळला आणि नंतर खाली असलेल्या दगडांवर पडला.

गंभीर जखमी अवस्‍थेत त्‍याला उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले, पण सायंकाळी त्याची प्राणज्योत मावळली. रोहन खेडेकर याने अतिवेगाने वाहन चालवल्याने हा अपघात घडला, असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT