Goa Accident : राज्‍यात अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीवरील ताबा सुटल्याने दोन मित्रांनी गमावला जीव

Goa Accident : कोलव्‍याला दुचाकीवरून जात असताना त्‍यांचा ताबा सुटून त्यांच्या दुचाकीने प्रथम संरक्षक कठड्याला धडक दिली व नंतर वीजखांबाला जोरदार धडक दिली.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident: राज्‍यात अपघातांची मालिका सुरूच आहे. काल रविवारी रात्री मुंगूल-मडगाव येथे झालेल्‍या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. दालू कुजार (21) व जीवन सोरेन (17) अशी त्यांची नावे असून ते दोघेही मूळ झारखंडमधील आहेत. कोळंब-रिवण येथे ते राहत होते. ते दोघेही मित्र होते.

कोलव्‍याला दुचाकीवरून जात असताना त्‍यांचा ताबा सुटून त्यांच्या दुचाकीने प्रथम संरक्षक कठड्याला धडक दिली व नंतर वीजखांबाला जोरदार धडक दिली. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात घडल्‍याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, फातोर्ड्याचे पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्‍यांचे कुटुंब गोव्यात पोहोचल्यावर मृतदेहांची चिकित्सा केली जाणार आहे. उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर पुढील तपास करीत आहेत.

Goa Accident
Manish Sisodia: दिलासा नाहीच, मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

घटनास्थळी हेल्‍मेट सापडले

अपघात झालेल्‍या ठिकाणी पोलिसांना हेल्मेट आढळून आले आहे. मृतांचे कुटुंब झारखंड येथे राहत असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून पोलिसांनी अपघाताची माहिती दिली आहे. मृतदेह हॉस्‍पिसियो इस्पितळाच्या शवागारात ठेवले असून हळहळ व्‍यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
Sanguem Goa Bison Attack
Goa malaria cases last 9 years zero deaths report
Goa Divorce Cases
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com