Goa national highway accident report Dainik Gomantak
गोवा

Goa Road Accidents: राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा! 5 वर्षांत 4,657 अपघातांत 1,011 जणांचा मृत्यू; सर्वाधिक बळी 45 ते 60 वयोगटातील

Goa Accident Statistics: गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यातील महामार्गांवर एकूण ४६५७ अपघात होऊन १०११ जणांचा मृत्‍यू झाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सिद्धार्थ कांबळे

पणजी: गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यातील महामार्गांवर एकूण ४६५७ अपघात होऊन १०११ जणांचा मृत्‍यू झाला आहे. त्‍यात ४५ ते ६० वर्षे वयोगटातील मृतांची संख्‍या सर्वाधिक असल्‍याचे केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्‍या अहवालातून समोर आले आहे.

२०२२ आणि २०२३ नंतर राष्‍ट्रीय महामार्गांवरील अपघातांची संख्‍या घटली, तरी मृत आणि जखमींचे प्रमाण वाढल्‍याचे आकडेवारीतून दिसून येते. सोबतच सुमारे ४४ टक्‍के मृत्‍यू हे ०-३५ वयोगटातील असल्‍याचेही आकडेवारी सांगते.

दरम्‍यान, गोव्‍यासह देशभरातील राष्‍ट्रीय महामार्गांवरील अपघात तसेच त्‍यात मृत पावणाऱ्यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी केंद्र सरकारकडून आवश्‍‍यक त्‍या सर्व उपाययोजना केल्‍या जात आहेत. देशभरातील राष्‍ट्रीय महामार्गांवरील अपघातप्रवण क्षेत्रे हटवण्‍यात येत आहेत.

राज्‍य वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांमध्‍ये जागृतीचे पूर्ण प्रयत्‍न सुरू असून, नव्‍या मोटारवाहन कायद्याची कडक अंमलबजावणी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील दंडात वाढ करण्‍यात आली आहे, असे केंद्रीय रस्‍ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अहवालात म्‍हटले आहे.

महामार्गांवरील अपघात

वर्ष अपघात मृत्‍यू जखमी

२०२२ १,२५९ २७१ ३२७

२०२३ १,१२५ २९० ३४५

२०२४ ९२० २८६ २५७

२०२५ ८३६ १०५ ७५२

२०२६ ५१७ ५९ ४७७

एकूण ४,६५७ १,०११ २,१५८

वयोगटानुसार मृत्‍यू

वर्ष १८ पेक्षा कमी १८-२५ २५-३५ ३५-४५ ४५-६० ६० पेक्षा जास्‍त माहीत नाही

२०२२ २ ५४ ५४ ६६ ६२ ३३ –

२०२३ ८ ५३ ६९ ४८ ६९ ४३ –

२०२४ ६ ६१ ६३ ५१ ६९ ३६ –

२०२५ २ २२ २४ १५ २८ १२ २

२०२६ २ ३ १९ ६ १५ १४ ०

एकूण २० १९३ २२९ १८६ २४३ १३८ २

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT