Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Mango Tree Branch Falls on Cars: सावंतवाडा-चावडेर येथे मोकळ्या जागेत पार्क केलेल्या चार वाहनांवर आंब्याच्या झाडाची मोठी फांदी मुळापासून तुटून कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले.
Mango Tree Branch Falls on Cars
Mango Tree FallDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

आमोणे: सावंतवाडा-चावडेर येथे मोकळ्या जागेत पार्क केलेल्या चार वाहनांवर आंब्याच्या झाडाची मोठी फांदी मुळापासून तुटून कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वाहनमालकांनी व्यक्त केला.

सुरेश मंगेश सावंत यांची वॅगनार (जीए ०६ डी ४४८६), नरेश कुबल यांची इग्निस (जीए ०४ ई ६२०४), रामा वास्तु सावंत यांची स्विफ्ट (जीए ०६ डी ४४८६) आणि किशन तारी यांची स्विफ्ट (जीए ०४ एच ४०१३) ही चार वाहने शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे चावडेर येथे पार्क करण्यात आली होती. शनिवारी सकाळी आंब्याच्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटून चारही वाहनांवर कोसळली.

Mango Tree Branch Falls on Cars
Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

घटनेची माहिती मिळताच साखळी पोलिस चौकी, डिचोली अग्निशामक दल आणि १०० क्रमांकाची मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या फांदीचे तुकडे करून ती वाहनांवरून बाजूला केली. पोलिसांनी पंचनामा केला. वीज खात्याचे कर्मचारी देवानंद सावंत, महादेव नाईक आणि सनिल परब यांनी वीजतारा व खांबाची दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com