Dr. Sandeep Pathak  Dainik Gomantak
गोवा

Goa AAP : ‘Lok Sabha Election’ स्वबळावर लढणार; आपची घोषणा

भाजपवर केली जोरदार टीका

दैनिक गोमन्तक डिजिटल

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत युती करण्याबाबत आम आदमी पक्षाने (आप) कोणत्याही पक्षाशी चर्चा वा संवाद साधलेला नाही. त्यामुळे तूर्त तरी देशात व गोव्यातही स्वबळावरच ही निवडणूक लढविली जाणार आहे. इतर राज्यात जनतेला प्रामाणिक असलेला एकमेव ‘आप’ पक्ष दिसतो. त्यांच्यामुळे या पक्षाचा विस्तार सध्या वाढत आहे.

भाजपने सत्तेवर आल्यापासून विध्वंसक राजकारण केले आहे, तर आपने सकारात्मक राजकारण दिल्याने सामान्य माणसांचा या पक्षावरील विश्‍वास वाढतो, असे मत आपचे सरचिटणीस (संघटन) व पंजाबचे राज्यसभा खासदार डॉ. संदीप पाठक यांनी व्यक्त केले.

पक्षनेत्यांच्या तसेच स्वयंसेवकांच्या बैठकीसाठी खासदार डॉ. संदीप पाठक हे गोव्यात आले आहेत. ‘आप’ अधिक मजबूत करण्यासाठी राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत जाण्याचा आराखडा या बैठकीत तयार करण्यात येत असून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

या बैठकीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला गोव्यातील आपचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगश व आमदार क्रुझ सिल्वा तसेच गोव्यातील आपचे प्रमुख ॲड. अमित पालेकर व इतर नेते उपस्थित होते.

चौकशीला केजरीवाल येणार!

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ॲड. अमित पालेकर यांना पोलिसांनी समन्स बजावले असले तरी भाजप सरकारकडून खोटे आरोप करून सतावणूक करण्याची ही पद्धत देशभर सुरू आहे.

आप’ हा कोणालाही न घाबरणारा पक्ष आहे, असे प्रकार करून ते इतर पक्षामध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर केजरीवाल यांना समन्स पाठवले असेल तर ते नक्कीच त्याला प्रतिसाद देतील व गरज भासल्यास ते चौकशीलाही उपस्थित राहतील., असे डॉ. पाठक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG ODI: सौरव गांगुलीच्या 'त्या' रेकॉर्डची बरोबरी करायला किंग कोहली सज्ज! मैदानात पाऊल ठेवताच रचणार इतिहास; इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका गाजवणार

Donald Trump: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा!' डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी वृत्तपत्राचा इशारा; आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

Labh Drishti Yog 2026: तिजोरी हाऊसफुल्ल होणार, व्यापाऱ्यांना बंपर फायदा! शनी-मंगळाचा 'लाभ दृष्टी योग' बदलणार 4 राशींचे नशीब; सर्व अडचणींचा द एंड

Road Accident: लग्नाचा आनंद ठरला शेवटचा! दोन ट्रकांच्या भीषण धडकेत चिरडली पिकअप; 13 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी VIDEO

8th Pay Commission Latest Update: पगारवाढच नाही, तर बोनस आणि ग्रॅच्युइटीमध्येही होणार मोठा फेरबदल! 8व्या वेतन आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT