मडगाव येथील व्यावसायिक फ्लोयड कुतिन्हो यांच्या विरोधात खोटी माहिती पुरवून केंद्रीय यंत्रणांकडून त्यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस काढल्याच्या आरोपाखाली पोलिस चौकशी प्राधिकरणासमोर दाखल केलेल्या प्रकरणात दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया हे स्वतः हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब सादर केला.
खनिज वाहतूक अडविली म्हणून आरटीआय कार्यकर्ते हनुमंत परब यांनीही एकोस्कर यांनी आपल्याला पोलिस कोठडीत मारहाण केली अशी तक्रार या प्राधिकरणा समोर केली असून या प्रकरणातही आता 20 जून रोजी सुनावणी होणार आहे.
मागच्या सुनावणीच्या वेळी समन्स पाठवूनही अधीक्षक धनिया हे स्वतः उपस्थित नव्हते त्यामुळे प्राधिकरणाच्या अध्यक्ष असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे आज ते स्वतः उपस्थित राहिले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जून रोजी ठेवण्यात आली आहे.
कुतिन्हो हे आपल्या वैयक्तिक कामासाठी ‘युके’मध्ये गेलेले असताना गोव्यात त्यांच्या विरोधात वॉरंट तहकूब आहे, असे सांगून त्यांच्या विरोधात ही लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
आपल्यावर राग काढण्यासाठी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सागर एकोसकर यांनी अधीक्षक धनिया यांना खोटी माहिती पुरवून ही नोटीस जारी करण्यास भाग पाडले, असा दावा कतिन्हो यांनी करून धानिया, एकोस्कर आणि अन्य तीन पोलिसाविरोधात या प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.